शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

गोटा झालेला टायर ताबडतोब काढून टाकणेच गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 6:00 PM

कोणत्याही वाहनाला गोटा झालेला टायर वापरणे हे अतिशय धोकादायक असून ते टायर्स ताबडतोब काढून चांगले नवीन टायर लावणे आवश्यक असते. कारण तसे टायर वापरणे पूर्णपणे असुरक्षित आहे.

ठळक मुद्देसाधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतोवैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतातटॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात

टायरच्या बाबतीत अनेकजण बेफिकिर असतात. वैयक्तिक वापरासाठी कार घेतलेले अनभिज्ञ असल्याने त्यांना फार माहिती नसल्याने अनेकदा टायरचे आयुष्य संपल्यानंतरही तो वापरत असतात तर बराच प्रवास केल्यानंतर टायर गोटा होण्यापूर्वीच ते टायर बदलतातही. मात्र दुचाकी वापरणारे बरेचजण टायर बदलण्याच्या भानगडीतच पडत नाहीत, फार वापर नाही,चलता है, फार लांब जात नाही, जवळपास जाण्यासाठीच वापरतो, असे सांगत टायर बदलून नवीन टायर बसवावा, असे अनेक स्कूटर मालकांना वाटत नाही. किमान पाच वर्ष तरी मी टायर बदलत नाही, असे सांगणारेही काही महाभाग भेटले. कारच्या बाबतीत पाहिले तर टॅक्सी,टुरिस्टसाठी वैयक्तिक नोंदणीच्या एसयूव्ही वापरणारे, रिक्षावाले, मालवाहतूक करणारे,पाण्याचे टॅकर्स यांच्या अनेकांच्या टायर्सची स्थिती फार बिकट असते, तरीही ते भारतीय स्थितीत गाड्या चालवतात. त्यांना पैसे वाचवणे हे महत्त्वाचे वाटते.

साधारणपणे प्रत्येक टायरला एक आयुष्य असते, विशिष्ट किलोमीटर रनिंग झाले की तो बदलावा लागतो. वैयक्तिक कार वापरणारे मात्र त्या मानाने टायर गोटा होण्यापूर्वीच बदलतात. मात्र टॅक्सी, टुरिस्टच्या गाड्या, टॅकर व रिक्षाचालक बेफिकिर व नको तेथे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करून प्राण धोक्यात घालत असतात.

टायरवरील नक्षीकाम व त्याची खोली चांगली असली पाहिजे पण ते नक्षीकामही दिसेनासे झाल्यानंतर टायर वापरणे हे धोकादायक आहे. सुरक्षित नाही. त्यामुळे वाहन स्कीट होऊन उलटणे, रस्त्यावर ग्रीप वा पकड नसणे, ब्रेक नीट न लागणे, टायर अनेकदा पंक्चर होणे, तो जास्त गर होऊन ब्लास्टही होणे असे प्रकार होत असतात. असे टायर रिमोल्ड करण्याच्याही पात्रतेचे नसतात. यासाठीच गोटा झालेले हे टायर पूर्णपणे निकाली काढणेच गरजेचे आहे. खरे म्हणजे अशा वाहनांची तपासणी होऊन त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची गरज आहे.प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्रास हे टायर वापरले जातात. डंपर, कचर्याच्या गाड्या या अशाच टायरवर चालवायच्या असतात, त्याने खर्च वाचतो, अशी धारणाच अशा वाहनांच्या मालकांनी करून घेतलेली असते. भारतात अजून तरी या प्रकारावर आवश्यक तितके निर्बंध नाहीत, ते घातले जाणे गरजेचे आहे. किमान त्यामुळे दुसऱ्याच्या प्राण व वित्तहानीचे तरी नुकसान होणार नाही.

 

टॅग्स :carकारAutomobileवाहन