हैदराबादच्या व्यावसायिकानं खरेदी केली देशातील सर्वात महागडी SUV; किंमत १० कोटी रूपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:04 IST2021-06-09T20:03:16+5:302021-06-09T20:04:41+5:30
Cullinan Black Badge असं या SUV चं नाव आहे. ही ठरलीये देशातील सर्वात महागडी एसयुव्ही.

हैदराबादच्या व्यावसायिकानं खरेदी केली देशातील सर्वात महागडी SUV; किंमत १० कोटी रूपये
हैदराबादच्या एका व्यावसायिकानं देशातील सर्वा महागडी एसयुव्ही Cullinan Black Badge खरेदी केली आहे. जगात आपल्या लग्झरी कार्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीश कार उत्पादक कंपनी रोल्स रॉयसनं भारतात गेल्या वर्षी सर्वात महागडी Cullinan चं Black Badge एडिशन लाँच केलं होतं. हैदराबादमधील व्यावसायिक नसीर खान यांनी ही कार खरेदी केली आहे. त्यांच्याकडे यापूर्वीपासून रोल्स रॉयसचे अनेक मॉडेल्स आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार Rools Roys च्या या जबरदस्त एसयुव्हीची किंमत १० कोटी रूपये आहे. ही एसयुव्ही कंपनीनं २०१६ मध्ये जिनेव्हा मोटर शोदरम्यान पहिल्यांदा सर्वांच्या समोर आणली होती. परंतु गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ही कार भारतात लाँच करण्यात आली. या कारची एक्स शोरूम किंमत ८.२० कोटी रूपये इतकी ठेवण्यात आली होती.
दरम्यान, हे कंपनीचं सिग्नेचर मॉडेल आहे. तसंच ही एसयुव्ही जबरदस्त इंजिन आणि अॅडव्हान्स, लग्झरी फीचर्ससोबत येते. जागतिक बाजारात कंपनीच्या बेस्ट सेलिंग मॉडेलपैकी हे एक मॉडेल आहे. ही एसयुव्ही डार्क ब्लॅक थीमनं सजवण्यात आली आहे, जो या कारचं लूक लग्झरी आणि प्रिमिअम बनवतो. या कारची किंमत स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत १.२५ कोटी रूपयांनी अधिक आहे.