शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

MINI कारने भारतीय बाजारपेठेत उडवली खळबळ; एकदा चार्ज केल्यानंतर धावेल 270 किमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:01 IST

Electric Cooper SE : कंपनी मार्चपासून ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना सुपूर्द करण्यास सुरुवात करेल आणि या कारच्या पुढील बॅचसाठी बुकिंगही सुरू करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : MINI ने भारतात पूर्णपणे इलेक्ट्रिक Cooper SE लाँच केली आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत रु. 47.20 लाख आहे. ही कार संपूर्णपणे देशात विकली जात आहे आणि ही ईव्ही केवळ फुल लोडेड व्हेरिएंटमध्ये भारतात आणली गेली आहे. कंपनीने मार्केटमध्ये विक्रीसाठी फक्त 30 युनिट्सचे वाटप केले होते आणि बुकिंग सुरू होताच, सर्व युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनी मार्चपासून ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना सुपूर्द करण्यास सुरुवात करेल आणि या कारच्या पुढील बॅचसाठी बुकिंगही सुरू करण्यात येणार आहे.

MINI ने ऑल-इलेक्ट्रिक कूपर राउंड एलईडी हेडलॅम्प, युनियन जॅक थीम एलईडी टेललाइट्स आणि चांगली डिझाइन केली आहे. इलेक्ट्रिक असल्याने, कारला एक मोठी साइड ब्लँक-आउट ग्रिल, बदल केलेला फ्रंट बंपर, दुसऱ्या डिझाइनचा बॅक बंपर आणि मिरर तसेच व्हील्सवर चमकदार पिवळे एक्सेंट दिले आहे. अधिक चांगल्या लूकसाठी सोबत आकर्षक 17-इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कूपर एसईला इंधनावर चालणाऱ्या कारच्या तुलनेत चांगले ग्राउंड क्लिअरन्स आहे. कंपनीने ही कार व्हाईट सिल्व्हर, मिडनाईट ब्लॅक, मूनवॉक ग्रे आणि ब्रिटिश रेसिंग ग्रीन या चार रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

कूपर एसईचे फीचर्स जवळजवळ सँडर्ड मिनी कूपर सारखीच आहेत, ज्यात 5.5-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे. फरक फक्त मध्य कन्सोलवर टॉगल स्विच आहे. मिनीचा दावा आहे की नवीन पॉवरट्रेनमुळे त्याच्या बूटस्पेसमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कूपर एसईला Apple CarPlay आणि Android Auto सह 8.8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्पोर्ट्स सीट हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, नप्पा लेदर स्टीयरिंग व्हील आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.

एका चार्जमध्ये किती धावते कूपर एसईमध्ये 32.6 kW-R बॅटरी पॅक आहे, जी 184 बीएचपी आणि 270 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. ती कारचा वेग 0-100 किमी/ताशी 7.3 सेकंदात वाढवते, तर तिचा टॉप स्पीड 150 किमी/ताशी आहे. कारला मिड, स्पोर्ट, ग्रीन आणि ग्रीन प्लस असे चार ड्राइव्ह मोड देण्यात आले आहेत. एका चार्जवर, ही कार 270 किमी पर्यंत चालवता येते, तर फास्ट चार्जरच्या मदतीने, ही ईव्ही कार केवळ 36 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होते. सामान्य चार्जरने ती सुमारे अडीच तासांत 0-80 टक्के चार्ज होते, तर पूर्ण चार्ज होण्यासाठी साडेतीन तास लागतात.

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसायelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर