शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एमजी मॅजेस्टर एसयूव्ही लाँच, मेपासून डिलिव्हरी; मसाज सीट, ३६० डिग्री कॅमेरा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:44 IST

एमजी मॅजेस्टर एसयूव्ही खडकाळ, वाळवंट, चिखल आणि बर्फाळ अशा कोणत्याही प्रकारच्या वातावरणात चालविण्यासाठी उपयुक्त आहे.

नवी दिल्ली : एमजी मोटर इंडियाने अत्याधुनिक अन् तेवढीच आरामदायक अशी एमजी मॅजेस्टर प्रीमियम एसयूव्ही गाडी गुरुवारी लाँच केली. गाडीचे प्री-बुकिंग सुरू झाले असून मे महिन्यापासून ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाणार आहे.

एमजी मोटरचे प्रबंध संचालक अनुराग महरोत्रा, विनित रैना आणि उदित मलहोत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, एमजी मॅजेस्टर ही एका कुटुंबाची फॅमिली ट्रिपपासून ते ॲडव्हेंचरस ट्रिपपर्यंतच्या सर्व प्रवासाच्या गरजा पूर्ण करणारी आरामदायक अशी गाडी आहे. या एसयूव्हीला सिंगल गाडी मल्टिपल सोल्युशन म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. एमजी मॅजेस्टर एसयूव्ही खडकाळ, वाळवंट, चिखल आणि बर्फाळ अशा कोणत्याही प्रकारच्या वातावरणात चालविण्यासाठी उपयुक्त आहे. ड्रायव्हरच्या सहकार्याशिवाय कोणत्याही परिस्थितीतून सहज बाहेर निघू शकेल अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे. 

गाडीमध्ये आहे मसाज सीटही एसयूव्ही तीन श्रेण्यांत उपलब्ध होणार आहे. यात सहा आणि सात आसनी गाडीचा समावेश आहे. मसाज सीट आहे आणि पाय लांब करण्यासाठी बरीच मोठी जागा मिळणार आहे. मे महिन्यापासून गाडीची किल्ली ग्राहकांच्या हातात दिली जाणार आहे. ग्राहकांना पाच वर्षांची वॉरंटी, मोफत सेवा आणि रोडसाइड असिस्टन्स दिले जाणार आहे.

३६० डिग्री कॅमेरा अन्...गाडीत १२.३ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा, जेबीएल ऑडिओ सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आहे. परिस्थितीनुसार कोणत्या चाकावर जास्त भर द्यायचा, याचा निर्णय गाडी स्वत: घेऊ शकते. एका कुटुंबाला गाडी आकाराने मोठी, सुखसोयींनी युक्त आणि खिशाला परवडणारी अशी हवी असते. मॅजेस्टर एसयूव्ही या सर्व गरजा पूर्ण करते, असा दावाही महरोत्रा यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : MG Motor Launches Majester SUV with Massage Seats, 360 Camera

Web Summary : MG Motor India launched the Majester SUV, offering massage seats, a 360-degree camera, and advanced technology. Pre-booking is open, with deliveries starting in May. It suits various terrains and family needs, featuring a 12.3-inch infotainment system and panoramic sunroof. Five-year warranty included.
टॅग्स :Automobileवाहन