४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:10 IST2026-04-10T14:08:46+5:302026-04-10T14:10:28+5:30

MG Majestor India Launch : MG Majestor ने ४०६.४ टन वजनाची ट्रेन ३०० फूट खेचून नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. भारताच्या या पहिल्या D+ SUV ची ताकद आणि फीचर्स जाणून घ्या.

MG Majestor India Launch : Have you seen a car pulling a 406-ton train? mg majestor guinness world record pulled 406 ton train marathi news | ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...

४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...

एका दणकट कारने थोडी थोडकी नव्हे तर ४०६ टन वजनाची पॅसेंजर ट्रेन ओढून दाखविली आहे. यामुळे ऑटोमोबाईल विश्वात खळबळ उडाली आहे. JSW MG Motor India ची येऊ घातलेली ऑफरोडिंग एसयुव्ही MG Majestorने ही ताकद दाखविली आहे. 

भारताची पहिली 'D+' सेगमेंटची एसयूव्ही मानल्या जाणाऱ्या MG Majestor ने चक्क ४०६.४ टन वजनाची अवजड ट्रेन ३०० फूट अंतर खेचून एक नवा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' (प्रस्थापित केला आहे. कोणत्याही एसयूव्हीने रेल्वेच्या रुळावर इतकी प्रचंड वजनाची ट्रेन खेचण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कुठे आणि कसा झाला हा विक्रम?
हा थरारक प्रयोग जम्मू-काश्मीरमधील काकापोरा आणि अवंतीपोरा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान पार पडला. या विक्रमासाठी वापरलेल्या ट्रेनमध्ये एक WAG-9HC इंजिन, प्रवासी डबे आणि गार्ड डब्याचा समावेश होता, ज्याचे एकूण वजन ४०६ टन पेक्षा जास्त होते. MG Majestor ने ही ट्रेन ३०० फुटांपर्यंत खेचून ४०० टन आणि १०० फुटांचा जुना जागतिक विक्रम मोडीत काढला.

इंजिनची ताकद...
विशेष म्हणजे, या विक्रमासाठी गाडीच्या इंजिनमध्ये कोणताही तांत्रिक बदल करण्यात आला नव्हता. ही एक सामान्य स्टॉक गाडी होती. यामध्ये २.० लिटरचे ट्विन टर्बो डिझेल इंजिन आहे, जे २१५.५ PS पॉवर आणि ४७८.५ Nm टॉर्क जनरेट करते. ऑटोमोबाईल तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हा प्रयोग करण्यात आला, जेणेकरून गाडीला बाहेरून कोणतीही मदत मिळणार नाही याची खात्री करण्यात आली.

एमजीची ही मॅजेस्टर येत्या काही दिवसांत भारतात लाँच होत आहे. खासकरून ऑफरोडिंगसाठी ही एसयुव्ही बनविण्यात आली आहे. असे असले तरी तिचा लूक भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी देखील तयार करण्यात आला आहे. 

Web Title : MG मेजेस्टर: कार ने 406 टन की ट्रेन खींची, गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाया

Web Summary : MG मेजेस्टर ने जम्मू और कश्मीर में 406.4 टन की ट्रेन को 300 फीट खींचकर गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाया। भारत की पहली 'D+' सेगमेंट एसयूवी, MG मेजेस्टर में 2.0-लीटर ट्विन-टर्बो डीजल इंजन है। यह एसयूवी जल्द ही भारत में लॉन्च होगी।

Web Title : MG Majestor: Car pulls 406-ton train, sets Guinness World Record

Web Summary : MG Majestor, India's first 'D+' segment SUV, achieved a Guinness World Record by pulling a 406.4-ton train 300 feet in Jammu & Kashmir. The stock car, with a 2.0-liter twin-turbo diesel engine, was unaltered for the feat. The SUV is launching soon in India.