MG नं लॉन्च केली नवी ढासू 7-सीटर SUV, हिच्या सामोर टाटा सफारी, फॉर्च्यूनरही फेल; जबरदस्त आहे सेफ्टी अन् फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 16:47 IST2023-05-30T16:44:48+5:302023-05-30T16:47:51+5:30
ही आता अपडेटेड एक्सटेरिअर आणि जबरदस्त केबीनसह येते.

MG नं लॉन्च केली नवी ढासू 7-सीटर SUV, हिच्या सामोर टाटा सफारी, फॉर्च्यूनरही फेल; जबरदस्त आहे सेफ्टी अन् फीचर्स
एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) सोमवारी ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्म व्हेरिअंट बाजारात लॉन्च केले आहे. हिची किंमत ₹40.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. ही आता अपडेटेड एक्सटेरिअर आणि जबरदस्त केबीनसह येते. खरे तर, हिच्यात फारसे कॉस्मॅटिक बदल करण्यात आलेले नाहीत. एमजी ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्ममध्ये (MG Gloster BLACKSTORM) मेटल ब्लॅक आणि मेटल ऐश कलरने हायलाइट करण्यात येणारे 'ग्लोस्टर' आणि 'इंटरनेट इनसाइड' साइनसह स्पोर्टी एलिमेंट्स आणि बॉडीवर्कवर रेड शेड्स बघायला मिळतात.
ब्लॅक-थीमचे इंटीरिअर -
एसयूव्हीच्या डार्क थीमला रूफ रेल, स्मोक्ड ब्लॅक टेललाइट, विंडो सराउंड, फेंडर आणि फॉग गार्निशने आणि अधिक सुंदर बनवण्यात आली आहे. SUV च्या केबीनमध्ये स्टिअरिंग व्हील, हेडलॅम्प्स, कॉलिपर्स तसेच फ्रंट आणि रिअर बम्परवर रेड एक्सेंटसह ब्लॅक-थीमचे इंटीरिअर देण्यात आले आहे. डार्क कलरची थीम असलेली लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, लाल टांक्यांनी शिवलेली आहे. यामुळे संपूर्ण इंटीरिअरला एक स्पोर्टी टच येतो.
लेवल 1 ADAS सेफ्टी फीचर्स -
ग्लोस्टर एसयूव्हीला 2wd आणि 4wd दोन्हीतही सादर केल्या जात आहेत. यात 7 ड्राइव्ह मोड्स बघायला मिळतात. जे हिला वेगवेगळ्या भागांत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वेग घेण्यास मदत करतात. ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्म 2.0-लिटर डिझेल इंजिनपासून पॉवर घेते. सेफ्टी हायलाइट्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, आता ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्मला 30 हायलाइट्स मिळतात. यात लेव्हल 1 अॅडव्हॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिमचाही (ADAS) समावेश आहे.