भारतात इलेक्ट्रिक कारची (EV) मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती. मध्यमवर्गीय आणि बजेटचा विचार करणारे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, कमी रनिंग कॉस्ट, उत्सर्जन शून्य आणि सरकारकडून मिळणारी सबसिडी, यांमुळे इलेक्ट्रिक कारची खरेदी आता अधिक सोपे झाली आहे. जर आपणही १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, पुढील तीन पर्याय आपल्यासाठी अत्यंत चांगले ठरू शकतात.
एमजी कॉमेट ईव्ही (MG Comet EV) - एमजी कॉमेट ईव्ही ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. हिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७.५० लाख रुपये एवढी आहे. या कारसोबत १७.३ kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी एका चार्जमध्ये २३० किमी एवढी रेंज देते. शहरातील रोजच्या प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकते. महत्वाचे म्हणजे, या काससोबत ड्युअल स्क्रीन सेटअप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, की-लेस एंट्री आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी आधुनिक फीचर्स देखील देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, नॉर्मल AC चार्जरने ही कार 7 तासांत चार्ज केली जाऊ शकते.
टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) - टाटा टियागो ईव्ही ही लोकप्रिय कार ७.९९ लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. हिला दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत. ही २५० ते ३१५ किमीपर्यंतची रेंज देते. हिला फास्ट चार्जिंग सुविधाही देण्यात आली आहे, ज्याद्वारे ही कार ५८ मिनिटांत १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. फीचर्सचा विचार करता, या कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, क्रूज कंट्रोल, मल्टीपल ड्राइव्ह मोड्स आणि डुअल एअरबॅग्ज देण्या आल्या आहेत.
टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV) -टाटा पंच ईव्ही ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही (SUV) कार आहे. हिची किंमत ९.९९ लाखांपासून सुरू होते. एकदा चार्ज केल्यानंतर, ही कार ३१५ ते ४२१ किमीपर्यंत रेंज देते. फार्ट चार्जिंगवर ही कार ५६ मिनिटांत १०-८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. महत्वाचे म्हणजे, सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ६ एअरबॅग्स यांसारखे अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.
Web Summary : India's electric car demand surges due to rising fuel costs. MG Comet EV, Tata Tiago EV, and Tata Punch EV offer affordable options under ₹10 lakh with decent range and modern features, making EV ownership accessible.
Web Summary : भारत में पेट्रोल की बढ़ती कीमतों के कारण इलेक्ट्रिक कारों की मांग बढ़ रही है। एमजी कॉमेट ईवी, टाटा टियागो ईवी और टाटा पंच ईवी 10 लाख रुपये से कम कीमत पर शानदार रेंज और आधुनिक सुविधाओं के साथ उपलब्ध हैं, जिससे ईवी खरीदना आसान हो गया है।