शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

मर्सिडीजने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त EV कार; फूल चार्जवर 560km ची रेंज, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:44 IST

Mercedes-Benz EQA : या नवीन EV कारचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे.

Mercedes-Benz EQA : लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने भारतात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. Mercedes-Benz EQA असे या EV कारचे नाव आहे. मर्सिडीज-बेंझ EQA सह सध्या कंपनीच्या इंडिया EV लाइन-अपमध्ये EQB 7-सीटर SUV, EQE SUV आणि EQS सेडान आहे. या नवीन मर्सिडीज-बेंझ EQA साठी आजपासून बुकिंग सुरू झाले असून, डिलिव्हरी जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. 

किंमत किती? मर्सिडीज-बेंज EQA मध्ये क्रॉसओव्हरसारखी स्टायलिंग असून, फ्रंट ग्रिल पॅनलवर मर्सिडीज सिग्नेचर स्टार पॅटर्न आणि फ्रंटमध्ये रुंद लाईट बार आहे. याचे रिअर डिझाईन EQB सारखेच आहे. कंपनीने ही कार 7 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केली आहे. यात पोलर व्हाईट, कॉसमॉस ब्लॅक, माउंटेन ग्रे, हाय-टेक सिल्व्हर, स्पेक्ट्रल ब्लू, पॅटागोनिया रेड मेटॅलिक आणि माउंटेन ग्रे मॅग्नो सामील आहे. कंपनीने या गाडीची किंमत 66 लाख रुपये(एक्स शोरुम) निश्चित केली आहे. मर्सिडीज EQA ची थेट स्पर्धा Volvo XC40 Recharg आणि Kia EV6 सारख्या कारशी असेल. 

कारचे इंटेरीअरया कारच्या इंटेरीअरबद्दल बोलायचे झाल्यास, यात डॅशबोर्ड आणि डोअर ट्रिम पीसवर एस क्लास आणि EQS सारखे बॅकलिट स्टार पॅटर्न आहे. याशिवाय, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, डुअल-झोन क्लायमेट कंट्रोल, डिजीटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले, 10.25-इंच टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा आणि डॉल्बी एटमॉससह 710W 12-स्पीकर बर्मेस्टर साउंड सिस्टम मिळेल.

सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्स सुरक्षेसाठी कारमध्ये 7-एअरबॅग आणि ADAS सारखेच फिचर्स आहेत. विशेष म्हणजे, ही कार सिंगल चार्जवर 560km ची रेंज देते. ही कार 70.5kWh बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. ही बॅटरी फ्रंट-माउंटेड इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते. ही मेटर 190hp पॉवर आणि 385Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही EV फक्त 8.6 सेकंदात 0-100kph चा वेग पकडू शकते, तर याचा टॉप स्पीड 160kph आहे. 100kW DC फास्ट चार्जने ही कार फक्त 35 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज करता येते. तर, 11kW AC चार्जरद्वारे पूर्ण चार्ज होण्यास 7 तास लागतात.

टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन