Mercedes नं भारतात लाँच केली नवी E-Class कार; ७ सेकंदात १०० किलोमीटरचा वेग, पाहा किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:33 PM2021-03-16T19:33:38+5:302021-03-16T19:35:33+5:30

Mercedes Benz E Class : पाहा किती आहे किंमत आणि काय आहे विशेष

Mercedes Benz E Class facelift launched india prices start at Rupees 63 6 lakh rupees knwo features and more details | Mercedes नं भारतात लाँच केली नवी E-Class कार; ७ सेकंदात १०० किलोमीटरचा वेग, पाहा किती आहे किंमत

Mercedes नं भारतात लाँच केली नवी E-Class कार; ७ सेकंदात १०० किलोमीटरचा वेग, पाहा किती आहे किंमत

Next
ठळक मुद्देवाढती मागणी पाहता कंपनीनं भारतात लवकर लाँच केली ही कार तब्बल 7.6 सेकंदात कार पकडते 100 किमी प्रति तासाचा वेग

Mercedes-Benz नं आपली लक्झरी सेडान E-Class चं फेसलिफ्ट व्हेरिअंट भारतात लाँच केलं आहे. नवी कार सध्याच्या कारच्या तुलनेत निराळी आहे. या कारमध्ये फ्रन्टला नवी ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय यासोबत फ्रन्ट बम्पर आणि अलॉय व्हिल्सही देण्यात आले आहेत. E-Class मध्ये 2 लिटरचे चाक सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. ते 194bhp पॉवर आमि 320nm चा टॉर्क जनरेट करते. तसंच कंपनीनं ही कार दोन डिझेल व्हेरिअंटमध्ये लाँच केली आगे. ही कार या वर्षाच्या अखेरिस लाँच करण्याचा कंपनीचा मानस होता. परंतु E-Class ची वाढती डिमांड पाहता कंपनीनं ही कार वेळेपूर्वी लाँच केली आहे. 

ही कार पाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात E200 Expression व्हेरिअंटची किंमत 63.6 लाख रूपये,  E200 Exclusive ची किंमत 67.2 लाख रूपये, E220d Expression ची किंमत 64.8 लाख रूपये आणि E220d Exclusive ची किंमत 68.3 लाख रूपये आणि सर्वात महागड्या E350d व्हेरिएंटच्या कारची कीमत 80.9 लाख रूपये है. या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत. 

नवी Mercedes-Benz E-Class ही 2.0 लिटर पेट्रोल आणि डिझेल या पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे. पेट्रोल इंजिन 197 hp ची पॉवर आणि 320 Nm चा टॉर्क जेनरेट करतं. तर डिझेल पावरट्रेन 194hp ची पॉवर आणि 400Nm चं टॉर्क जनरेट करतं. नवी Mercedes-Benz E-Class ही LWB फॉर्ममध्ये सादर करणं कायम ठेवलं आहे. कारचं डिझाईन आणि लूकमध्येही काही बदल पाहायला मिळत आहे. कारचा फ्रन्ट लूक हा यापूर्वीच्या तुनेत अधिक स्पोर्टी आहे.

 यासोबतच कारचा रिअर लूकही अधिक आकर्षक करण्यात आला आहे. कारमध्ये स्पोर्टिअर एक्सटिरिअर डिझाईन आणि अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहे. तसंच यात नवे अॅडाप्टिव्ह एलईडी हेडलँप्स आणि एलईडी टेललँप्स देण्यात आले आहेत. E200 आणि E220 D ही कार तब्बल 7.6 सेकंदात 100 किमी प्रति तास तर 350D ही कार 6.1 सेकंदात 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे.

Web Title: Mercedes Benz E Class facelift launched india prices start at Rupees 63 6 lakh rupees knwo features and more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.