शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याची शानदार संधी, लगेच होईल 50000 रुपयांपर्यंत बचत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 20:13 IST

ही ऑफर 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनापर्यंत वैध असणार आहे. 

जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर एक शानदार ऑफर आली आहे. अहमदाबादच्या इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी मॅटरने जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त सवलतीच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. मॅटर एरा इलेक्ट्रिक बाइक खरेदी करून 50,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. ही ऑफर 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनापर्यंत वैध असणार आहे. 

सरकारने अलीकडेच FAME II सबसिडीमध्ये काही बदल केले आहेत. हे पाहता कंपनीने मॅटर एरा 5000 (Matter Aera 5000) आणि मॅटर एरा 5000 प्लस (Matter Aera 5000 Plus) इलेक्ट्रिक बाईक्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची किंमत 30,000 रुपयांनी वाढली आहे. मात्र, आता कंपनीच्या ऑफरचा फायदा घेतल्यास मोठी बचत होणार आहे.

6 जूनपासून मॅटर एरा 5000 ची किंमत 1,73,999 रुपये असणार आहे. दुसरीकडे, मॅटर एरा 5000 प्लससाठी 1,83,999 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे 5 जूनपर्यंत बाईक बुक केल्यास तुम्हाला 30,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार नाहीत. याशिवाय, एरा इलेक्ट्रिक बाईक फक्त 999 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ऑटोकॅपिटलवरून ते बुक करू शकता. 

बाईकची डिलिव्हरी या वर्षी सप्टेंबरपासून सुरू होईल. मॅटरच्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना थेट 30,000 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय 20,000 रुपयांचे केअर पॅकेजही दिले जात आहे. कंपनी तुम्हाला एकूण 50,000 रुपयांचा फायदा देत आहे. एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स राइड्स जूनपासून सुरू होतील. कंपनी शानदार वित्त योजना देखील ऑफर करत आहे.

गियर असलेली पहिली इलेक्ट्रिक बाईकमॅटर एरा ही भारतातील पहिली गियर इलेक्ट्रिक बाईक आहे. ज्यामध्ये 4 स्पीड हायपर-शिफ्ट गियर मिळतील. यामुळे 25 पैसे प्रति किलोमीटर मायलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे. मॅटरची इलेक्ट्रिक बाईक अवघ्या 6 सेकंदात 60kmph चा वेग पकडू शकते. ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 125 किलोमीटरचे अंतर कापेल. ग्राहकांना 7 इंची टचस्क्रीन आणि कनेक्टेड फीचर्सचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :bikeबाईकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन