खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 16:45 IST2025-08-24T16:44:01+5:302025-08-24T16:45:48+5:30
ही नवी SUV थेट, ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन तैगुन आणि टोयोटा हायराइडर सारख्या लोकप्रिय मध्यम आकाराच्या एसयूव्हींना थेट टक्कर देईल....

खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी सातत्याने नव-नवे मॉडेल्स सादर करत असते. आता ३ सप्टेंबर २०२५ रोजी एक नवीन एसयूव्ही लाँच होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विशेष म्हणजे ही एसयूव्ही एरिना डीलरशिप नेटवर्कद्वारे विकली जाईल. ती ब्रेझाच्या वरच्या आणि ग्रँड विटाराच्या खाल्या पोझिशनवर असेल.
कुणा-कुणासोबत असे फाइट? -
ही नवी SUV थेट, ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन तैगुन आणि टोयोटा हायराइडर सारख्या लोकप्रिय मध्यम आकाराच्या एसयूव्हींना थेट फाइट देईल.
इंजिन आणि व्हेरिअंट -
कंपनीने आपल्या या कारसंदर्भातील टेक्निकल डीटेल्स ऑफिशिअली शेअर केलेले नाहीत. मात्र, या कारला 1.5-लीटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाईल, असे मानले जात आहे. याशिवाय, हायब्रिड आणि CNG व्हर्जनही आणले जाऊ शकते. यामुळे ही SUV अधिक मायलेज आणि कमी रनिंग कॉस्टची इच्छा असणाऱ्या ग्राहकांनाही आकर्षित करू शकते.
पोझिशनिंग आणि फीचर्स -
ही SUV एरिना (Arena) एक फ्लॅगशिप कार असेल. याशिवाय ब्रेझाच्या (Brezza) तुलनेत मोठी आणि अधिक प्रीमियम असेल. तसेच, किंमतीच्या आणि फीचर्सच्या बाबतीत हिला ग्रँड व्हिटारा (Grand Vitara) पेक्षा खालच्या पातळीवर ठेवले जाईल.
कंपनीचे प्लॅनिंग -
कंपनीकडे आधीच एंट्री-लेव्हल ते प्रीमियम सेगमेंटपर्यंतच्या एसयूव्ही आहेत. आता नव्या एसयूव्हीसह, मारुती आपली रेंज आणखी मजबूत करेल आणि मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये अधिक शेअर मिळवण्याचे ध्येय ठेवेल.