Maruti Victoris : मारुती सुजुकीने काही दिवसांपूर्वीच लॉन्च केलेली Victoris अजून ग्राहकांपर्यंत पोहोचलेलीही नाही, मात्र त्याआधीच कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय,ज्यात अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडलेला दिसतो. या अपघातामध्ये कारची झालेली अवस्था पाहून, याच्या 5-स्टार सेफ्टी रेटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Maruti Victoris ची डिलिव्हरी आज (दि.22) पासून सुरू झाली आहे. त्यामुळेच या अपघाताची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आधीपासून मारुती सुझुकीवर कारच्या बिल्ड क्वालिटीमुळे नेहमी टीका होते. आता 5 स्टार रेटिंग असलेल्या नव्याकोऱ्या कारचा अपघात झाल्यामुळे पुन्हा एकदा सेफ्टीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात राजस्थानमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. अपघात झालेली कारची चाचणी सुरू असावी, असा अंदाज आहे.
कशी आहे Maruti Victoris ?
Maruti Victoris पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रिड, अशा प्रकारात मिळते. कारच्या बेस व्हेरिअंटची किंमत 10,49,900 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर टॉप एंड स्ट्राँग हायब्रिड मॉडेलची किंमत 19,98,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर सीएनजी व्हेरिअंट 11,49,900 रुपयांपासून मिळणार आहे.
मायलेज
या 5-सीटर एसयूव्हीचा मॅन्युअल प्रकार 21.१८ किमी/लिटर, ऑटोमॅटिक प्रकार 21.06 किमी/लिटर आणि ऑल-व्हील ड्राइव्ह प्रकार 19.07 किमी/लिटर मायलेज देतो. तर, सीएनजी प्रकार 27.02 किमी/किग्रॅ मायलेज देतो.