शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Maruti suzuki XL6 : ग्राहकांचं फेव्हरिट मारुती XL6 चं 2022 मॉडेल आणणार वादळ, मिळतील जबरदस्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 15:07 IST

या नव्या मॉडेलसहदेखील ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएम आणि स्टिअरिंगवरील कंट्रोल्ससारखे फीचर्स दिले जातील, असा अंदाज आहे.

नवी दिल्ली - मारुती सुझुकी 2022 मध्ये मार्केट जबरदस्त गरम करताना दिसत आहे. मारुतीचे अनेक प्रोडक्ट्स याच वर्षी लाँच केले जात आहेत. यांपैकी एक आहे Maruti Suzuki ची 2022 XL6 Facelift. ही कार लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे. 

या SUVचा फोटो नुकताच इंटरनेटवर समोर आला आहे. ही कार डिलरशिप यार्डवर दिसून आली. तसेच हे XL6 चे प्रोडक्शन मॉडेल दिसत आहे. स्पाय फोटोजनुसार, या नव्या MPV ला नव्या दोन रंगांचे मल्टी स्पोक अलॉय व्हील्स देण्यात येतील. तसेच, सध्याच्या मॉडलपेक्षा नवे मॉडेल साइजने काही प्रमाणात मोठे असेल, असा अंदाज लावला जात आहे.

समोरील ग्रिलमध्ये बदल - मारुती सुझुकीने सध्याच्या XL6 सोबत 15-इंचांचे ब्लॅक कलर्ड अलॉय व्हील्स दिले आहेत. हे व्हील्स हिच्या साइजच्या तुलनेत काही प्रमाणात छोटे दिसतात आणि ग्राहकांनी यासंदर्भात कंपनीला फीडबॅकही दिला होता. यामुळे नवे मॉडल मोठे अलॉय व्हील्ससह येऊ शकते. याशिवाय, नव्या XL6 सह बदललेले समोरील ग्रिल, नवे फीचर्स आणि नवे अपहोल्स्ट्री दिले जाऊ शकते. हे कार कंपनीचे सर्वात महागडे मॉडेल आहे. यात एलईडी हेडलॅम्प्स, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, मधल्या जागेत कॅप्टन सीट्ससह वन टच रिक्लाइन फंक्शन देण्यात आले आहेत.

सध्याच्या मॉडेलचे 1.5-लीटर इंजिन -या नव्या मॉडेलसहदेखील ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएम आणि स्टिअरिंगवरील कंट्रोल्ससारखे फीचर्स दिले जातील, असा अंदाज आहे. कंपनी 2022 XL6 मध्ये सध्याच्या मॉडेल प्रमाणेच 1.5-लीटर पेट्रोल माइल्ड-हायब्रिड इंजिन देऊ शकते. हे इंजिन 103 बीएचपी एवढी पॉवर आणि 138 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच कंपनीने या जिंजिनला 5-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. लाँच झाल्यानंतर, या कारचा सामना महिंद्रा मराजो आणि नुकत्याच लाँच झालेल्या Kia Carens MPV सोबत असेल.

 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन