5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:18 IST2025-05-09T18:16:44+5:302025-05-09T18:18:07+5:30
Maruti Suzuki : मारुती सुझुकीची ही कार तिच्या मायलेज आणि टिकाऊपणामुळे खूप पसंत केली जाते.

5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत...
Maruti Suzuki : भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांवर सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन लोक टीका करत असतील, पण त्यांच्या मायलेज, लो मेन्टेनन्स, टिकाऊपणा आणि रि-सेल व्हॅल्यूमुळे मोठी मागणी असते. अलीकडेच एका सेकंड-हँड कार खरेदी/विक्री करणाऱ्या एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, 5 वर्षे वापर झालेल्या मारुतीच्या गाड्यांनाही सेकंड हँड मार्केटमध्ये चांगली मागणी मिळत आहे.
ऑटोकारच्या रिपोर्टनुसार, स्पिनीने केलेल्या सर्वेक्षणात मारुती डिझायर, होंडा अमेझ आणि टाटा टिगोर यांचा समावेश करण्यात आला. साधारणपणे या कार भारतात फ्लीट व्हेईकल्स म्हणून सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी इंडिया ही गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत या सर्व कारच्या रि-सेल व्हॅल्यूच्या बाबतात सर्वोत्तम कंपनी ठरली आहे.
70 टक्क्यांपर्यंत रि-सेल व्हॅल्यू
स्पिनीच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, मारुती डिझायरच्या एकूण मूल्यात गेल्या 5 वर्षांत सुमारे 33 टक्के घसरण झाली. म्हणजेच, सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या इतर सर्व कारच्या तुलनेत, ग्राहकांना त्यांच्या मारुती कारची 5 वर्षांनतरही 70 टक्क्यांपर्यंत रि-सेल व्हॅल्यू मिळेल.
या पॅरामीटरवर, होंडा अमेझचे मूल्य 5 वर्षांत 38% ने कमी होते. म्हणजेच, होंडा कारची 60 टक्क्यांपर्यंत रि-सेल व्हॅल्यू मिळेल. सर्वात वाईट परिस्थिती टाटा टिगोरची आहे. सर्वेक्षणानुसार, 5 वर्षांत त्याचे मूल्य 47 टक्क्यांपर्यंत घसरते. म्हणजे गाडीला पाच वर्षांनंतर निम्मी किंमत मिळेल.
मारुतीची पहिली 5 स्टार रेटिंग कार
स्पिनीच्या सर्वेक्षणात ज्या मारुती डिझायरबद्दल बोलले गेले आहे. ही मारुती सुझुकीची पहिली 5-स्टार रेटिंग असलेली कार आहे. कंपनीने गेल्या वर्षीच लाँच केली होती. कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.84 लाख रुपये आहे. कंपनीने नवीन मारुती डिझायरमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे 80 बीएचपीची पॉवर आणि 112 एनएमचा टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांमध्ये येते. पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 24.79 किमी/लीटर, पेट्रोल एएमटी 25.71 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये 33.73 किमी/किलोग्राम मायलेज मिळेल.