मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:15 IST2025-09-19T20:14:50+5:302025-09-19T20:15:20+5:30

...यामुळे जर तुम्ही ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एकदा हिच्या मायलेजसंदर्भात नक्की जाणून घ्या...

maruti suzuki Maruti Victoris real mileage revealed the company has claimed 21Kmpl! | मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!

मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!


मारुती सुझुकी इंडियाची नवी व्हिक्टोरिस (Maruti Victoris) ही एरिना डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध असलेली टॉप मॉडेल आहे. कंपनीने याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपये ठरवली आहे. आता या SUV चे रिव्ह्यू तथा मायलेज संदर्भात माहिती समोर येऊ लागली आहे. हिच्या मायलेजशी संबंधित एक व्हिडिओ Gaadiwaadi.com ने शेअर केला आहे. त्यांनी व्हिक्टोरिसच्या FWD AT व्हेरिएंटचे मायलेज चेक केले आहे. महत्वाचे म्हणजे, हे या SUV चे टॉप एंड व्हेरिएंट आहे. यामुळे जर तुम्ही ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एकदा हिच्या मायलेजसंदर्भात नक्की जाणून घ्या...

विक्टोरिसची मायलेज टेस्ट दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर करण्यात आली. याच्या ODO मीटरवर कारचे आधीचे रनिंग 76 किमी एवढे होते. यानतंर, कारचा टँक फूल केल्यानंतर, टेस्ट सुरू करण्यात आली. या एसयूव्हीने सुरुवातीच्या 50 किमी दरम्यान सुमारे 18.9 किमी प्रति लिटर एवढे मायलेज दिले. या काळात ही कार जवळपास 80 किमी प्रतितास एवढे वेगाने धावली. 

या मायलेज टेस्टदरम्यान कारचे सर्व मोड्स देखील तपासण्यात आले. तसेच, कारचा कमाल वेग 150 किमी प्रतितासपर्यंतही पोहोचला होता. या SUV ला सुमारे 351 किमीपर्यंत चालवण्यात आले. यावेळी MID वर मायलेज 16.2 किमी एवढे दिसून आले. तसेच, कारमध्ये 22.41 लिटर पेट्रोल टाकण्यात आले. पेट्रोलच्या हिशेबाने हिचे खरे मायलेज 15.67 किमी प्रति लिटर एवढे होते. महत्वाचे म्हणजे, कंपनी या FWD AT संदर्भात 21.06 किमी प्रति लिटर मायलेजचा दावा करते.

Maruti Victoris मध्ये पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रिड असे प्रकार देण्यात आले आहेत. जवळपास २१ व्हेरिअंटमध्ये ही कार असणार आहे. या कारच्या टॉप एंड स्ट्राँग हायब्रिड मॉडेलची किंमत 19,98,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर सीएनजी व्हेरिअंट 11,49,900 रुपयांपासून मिळणार आहे. 


 

Web Title: maruti suzuki Maruti Victoris real mileage revealed the company has claimed 21Kmpl!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.