मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:25 IST2025-09-26T11:22:11+5:302025-09-26T11:25:24+5:30

Maruti Suzuki Market Cap news in Marathi: भारतीय ऑटो क्षेत्राचा ऐतिहासिक क्षण! मारुती सुझुकीने मार्केट कॅपमध्ये फोर्ड, जनरल मोटर्स, फोक्सवॅगनला मागे टाकले.

Maruti Suzuki Market Cap news in Marathi: Maruti Suzuki creates history; becomes world's 8th most valuable auto company, surpassing Ford, GM, Volkswagen | मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी

मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी

नवी दिल्ली: भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घटना घडली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSIL) ने जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली असून, ती जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी बनली आहे.

जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...

कंपनीने बाजारातील मूल्यांकनाच्या (Market Capitalization) बाबतीत थेट अमेरिकेच्या फोर्ड मोटर (Ford Motor), जनरल मोटर्स (GM) आणि जर्मनीच्या बलाढ्य फोक्सवॅगन (Volkswagen) सारख्या जागतिक दिग्गजांना मागे टाकले आहे.

भारतासाठी 'टॉप-१०' मध्ये प्रथमच प्रवेश
एका भारतीय ऑटो कंपनीने जगातील टॉप-१० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मारुती सुझुकीचे बाजार मूल्यांकन जवळपास $57.6 बिलियन (जवळपास ₹5 लाख कोटी) पर्यंत पोहोचले आहे. मारुती सुझुकी आता जागतिक स्तरावर आठव्या स्थानावर आहे, तर जनरल मोटर्स (९वे स्थान), फोक्सवॅगन (१०वे स्थान) आणि फोर्ड (१२वे स्थान) मारुतीच्या मागे आहेत.विशेष म्हणजे, मारुती सुझुकीचे मार्केट कॅप आता तिच्या जपानमधील पॅरेंट कंपनी सुझुकी मोटर (Suzuki Motor) पेक्षाही अधिक झाले आहे.

पहिल्या क्रमांकावर कोण...

एलन मस्कची कंपनी टेस्ला ही १.४७ ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह जागतिक ऑटो क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यानंतर जपानची टोयोटा ($३१४ अब्ज), चीनची BYD ($१३३ अब्ज), इटलीची फेरारी ($९२.७ अब्ज), जर्मनीची BMW ($६१.३ अब्ज) आणि मर्सिडीज-बेंझ ग्रुप ($५९.८ अब्ज) यांचा क्रमांक लागत आहे. 

घोडदौडीमागील कारणे
शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार, मारुतीच्या या अभूतपूर्व यशामागे अनेक प्रमुख कारणे आहेत:

उत्कृष्ट तिमाही निकाल: मजबूत विक्री संख्या आणि खर्च व्यवस्थापनामुळे कंपनीने विक्रमी नफा नोंदवला आहे.

GST सुधारणांची आशा: आगामी जीएसटी दरात कपातीची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांचा ऑटो स्टॉकवर विश्वास वाढला.

विदेशी गुंतवणूक: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय ऑटो समभागांमध्ये (Auto Stocks) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचा थेट फायदा मारुतीला झाला आहे.

मारुतीने केवळ विक्रीच्या बाबतीतच नाही, तर आता आर्थिक मूल्यांकनाच्या बाबतीतही जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे.

Web Title: Maruti Suzuki Market Cap news in Marathi: Maruti Suzuki creates history; becomes world's 8th most valuable auto company, surpassing Ford, GM, Volkswagen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.