Maruti Suzuki Jimny SUV: मारुतीची 'थार' रस्त्यावर टेस्टिंगवेळी दिसली; महिंद्राला आता 'जिम्नॅस्टिक' करावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 20:14 IST2022-09-20T20:13:37+5:302022-09-20T20:14:07+5:30
मारुती सुझुकी जिम्नी चे जे मॉडेल चाचणी दरम्यान दिसले ते पूर्णपणे झाकलेले होते. तरीही एसयूव्हीचे बॉक्सी डिझाईन फीचर्स पाहता येत होते.

Maruti Suzuki Jimny SUV: मारुतीची 'थार' रस्त्यावर टेस्टिंगवेळी दिसली; महिंद्राला आता 'जिम्नॅस्टिक' करावे लागणार
मारुती सुझुकी लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. ऑटो एक्स्पो २०२० मध्ये मारुतीने Jimny (जिम्नी) य़ा महिंद्रा थार टाईप जिप दाखविली होती. ती आता रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहे. ही तीन दरवाज्यांची कार प्रत्यक्षात पाच दरवाज्यांत येण्याची शक्यता आहे.
Maruti Suzuki Jimny SUV ची टेस्टिंग आता रस्त्यांवर सुरु झाली आहे. भारतात ही कार स्पॉट झाली असून लवकरच ही कार विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये ही एसयुव्ही पुन्हा दाखविली जाण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकी जिम्नी चे जे मॉडेल चाचणी दरम्यान दिसले ते पूर्णपणे झाकलेले होते. तरीही एसयूव्हीचे बॉक्सी डिझाईन फीचर्स पाहता येत होते. जेक्टर सेटअपसह गोलाकार हेडलॅम्प, उभ्या स्लॅटसह ग्रिल आणि फ्लॅट बोनेट देण्यात आले आहे. पाठीमागे हॉरिजॉन्टल टेल लँप्स आणि टेलगेटवर एक स्पेअर व्हील लावलेले आहे.
सुझुकीने तीन-दरवाजा जिम्नीचा व्हीलबेस 300 मिमीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे 5-दरवाजा जिम्नीची लांबी 3,850 मिमी असेल. व्हीलबेस 2,250 मिमी वरून 2,550 मिमी पर्यंत वाढेल. यामुळे मधील दरवाजे आणि प्रवाशांना बसण्यासाठी चांगली जागा करता येणार आहे. तीन दरवाजांच्या जिम्नीमध्ये मागे बसण्यासाठी प्रवाशांना सीट मागे पुढे करून आत-बाहेर करावे लागले असते, यामुळे ते अवघड झाले असते.
जिम्नीच्या इंटेरिअरबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. नवीन 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येऊ शकते. ही सिस्टिम बलेनो सारख्या कारमध्ये देण्यात येत आहे. सध्या बाहेरच्या देशांत जिम्नीमध्ये ७ इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. नवीन SUV मध्ये काही कनेक्टेड कार फीचर्स देखील मिळू शकतात.