शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

Maruti Grand Vitara CNG: मारुतीची जबरदस्त मायलेज देणारी सीएनजी SUV लॉन्च; जाणून घ्या, अ‍ॅडव्हांस्ड फीचर्ससह किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 13:43 IST

ही कार Nexa डीलरशिपद्वारे विकली जाणार असून डेल्टा आणि झेटा, अशा दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

मारुती सुझुकी इंडियाने आपल्या प्रसिद्ध SUV Grand Vitara चे नवे CNG व्हेरिअंट आज देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी लाँच केले आहे. ही कार Nexa डीलरशिपद्वारे विकली जाणार असून डेल्टा आणि झेटा, अशा दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यांची किंमत अनुक्रमे 12.85 लाख आणि 14.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी निश्चित करण्यात आली आहे.नव्या Maruti Grand Vitara CNG मध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेचे नॅच्युरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिन वापरले आहे. हे इंजिन 103bhp एवढी पॉवर  आणि 136Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी मोडमध्ये याचे पॉवर आउटपुट थोडे कमी होते आणि CNG मोडवर हे इंजिन 87bhp एवढी पॉवर आणि 121.5Nm चा टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीमध्ये केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन इंजिनचाच पर्याय उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणज, या कारचे सीएनजी व्हर्जन 26.6 किलोमीटर प्रति किलोग्राम पर्यंत मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. 

 Grand Vitara S-CNG चे व्हेरिअंट आणि किंमत (एक्स-शोरूम) - Delta (MT)    12.85 लाख रुपयेZeta (MT)     14.84 लाख रुपये 

मिळतील हे खास फीचर्स -  कंपनीने बसवलेल्या सीएनजी किट व्यतिरिक्त या एसयूव्हीमध्ये इतर कोणतेही बदल केलेले नाहीत. या एसयूव्हीमध्ये पूर्वीप्रमाणेच, स्मार्ट प्रो प्लस टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम, वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, सुझुकी कनेक्ट, सारखे फीचर्स मिळतात. याशिवाय, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरेमिक सनरूफ, एम्बीएंट लायटिंग, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि हेड-अप डिस्प्ले या एसयूव्हीला अधिकच विशेष बनवते.

सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रँड विटारामध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशनसह (EBD) अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर्ससरखे फीचर्स देण्यात आले आहेत.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन