शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Maruti Suzuki Ertiga Launch : 7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:36 IST

Maruti Suzuki Ertiga Launch : कंपनीने एर्टिगा या 7-सीटर MPV मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे कारला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) भारतीय बाजारात 2022 एर्टिगा (2022 Ertiga) लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे, तर  MPV च्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 12.79 लाख रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, मारुती सुझुकीने एर्टिगाच्या टॉप मॉडेल ZXi सोबत पहिल्यांदाच CNG ऑप्शन आणला आहे. 

कंपनीने एर्टिगा या 7-सीटर MPV मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे कारला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. नवीन कार जुन्या मॉडेलच्या तुलनेत दिसण्यात थोडी वेगळी आहे. एर्टिगा भारतात पहिल्यांदा 2012 मध्ये लॉन्च करण्यात होती. त्यानंतर ग्राहकांमध्ये या परवडणाऱ्या फॅमिली कारची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही.

11 व्हेरिएंट्समध्ये लॉन्च मारुती सुझुकीने 2022 मॉडेल एर्टिगा MPV ला 11 व्हेरिएंट्समध्ये लॉन्च केले आहे,  ज्यामध्ये VXi, ZXi आणि ZXi Plus ला ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळतात, तर CNG ऑप्शन देखील दोन व्हेरिएंट्ससह उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन मारुती एर्टिगा सह, कंपनीने आधीच अॅडव्हान्स K-Series Dual VVT इंजिन दिले आहे, जे पूर्वीच्या इंजिनच्या तुलनेत खूपच किफायतशीर आहे. कंपनीने हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज केले आहे आणि आता ऑटोमॅटिक व्हेरियंटसह नवीन 6-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीने ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील दिले आहेत.

किती बदलला एक्सटीरियर?मारुती सुझुकीने 2022 एर्टिगाच्या बाहेरील भागामध्ये आमुलाग्र बदल केला आहे, जो आता दोन-रंगाच्या अलॉय व्हील आणि ग्रिलवर नवीन क्रोम फिनिशसह येतो. कंपनीने ही कार 6 रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये सिल्व्हर आणि ब्राऊन हे नवीन रंग आहेत. कारच्या केबिनमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहे आणि MPV आता नवीन 7-इंचाच्या टचस्क्रीन डिस्प्लेसह येते,  जी Suzuki Connect आणि Amazon Alexa ला सपोर्ट करते.

डॅशबोर्डवर टीक वुडन फिनिश देण्यात आला आहे, तर सीटवर दोन रंगांची अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. मधल्या सीटला फोल्ड केले जाऊ शकते, ज्यामुळे सामान ठेवण्यासाठी अधिक मिळू शकते. दरम्यान, भारतीय मार्केटमध्ये ही परवडणारी एर्टिगा MPV रेनॉल्ट ट्रायबरशी स्पर्धा करण्यास तयार आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन