संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:21 IST2025-08-22T18:20:58+5:302025-08-22T18:21:22+5:30

बिक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी फ्रोंक्स दुसऱ्या क्रमांकावर होती. मारुती फ्रोंक्सने या कालावधीत 17.82 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसह एकूण 12872 एसयूव्हींची विक्री केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर टाटाची नेक्सन राहिली.

maruti suzuki brezza priced under ₹9 lakh has become the favorite of the entire country; It left behind Nexon, Punch, and Frox; Despite a decline in sales, it became No. 1 | संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

भारतीय ग्राहकांमध्ये सब-कॉम्पॅक्ट (3.8 से 4 m) एसयूव्हि सेगमेंटची मागणी नेहमीच राहिली आहे. जुलै, 2025 संदर्भात बोलायचे झाल्यास, या सेगमेंटच्या विक्रीत पुन्हा एकदा मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Brezza) टॉप वर राहिली आहे. मारुती ब्रेझाला गेल्या महिन्यात एकूण 14,065 नवे ग्राहक मिळाले आहेत. तथापि, या कालावधीत मारुती ब्रेझाची विक्री वार्षिक आधारावर 4.16 टक्क्यांनी घटली आहे. भारतीय बाजारपेठेत, मारुती सुझुकी ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलमध्ये ८.६९ लाख रुपयांपासून ते १४.१४ लाख रुपयांपर्यंत आहे. तर जाणून घेऊयात गेल्या महिन्यात या सेग्मेंटमधील सर्वाधिक विक्री झालेल्या १० मॉडेल्सच्या विक्रीसंदर्भात 

पंचची विक्री 33% हून अधिक घटली -
बिक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी फ्रोंक्स दुसऱ्या क्रमांकावर होती. मारुती फ्रोंक्सने या कालावधीत 17.82 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसह एकूण 12872 एसयूव्हींची विक्री केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर टाटाची नेक्सन राहिली. टाटा नेक्सन या काळात 7.75 टक्क्यांच्या वार्षिक घसरणीसह एकूण 12,825 यूनिट्सची विक्री केली. याशिवाय चौथ्या क्रमांकावर टाटा पंच राहिली. टाटा पंचने या काळात 33 टक्क्यांच्या वार्षिक घसरणीसह एकूण 10,785 युनिट कारची विक्री केली. 

सातव्या क्रमांकावर महिंद्रा XUV 3XO -
याशिवाय, विक्रीच्या या यादीत Hyundai Venue पाचव्या क्रमांकावर होती. Hyundai Venue ने या कालावधीत एकूण 8,054 SUV विकल्या, हिच्या विक्रीत वार्षिक 8.89 टक्के घट झाली आहे. तर Kia Sonet विक्रीच्या या यादीत सहाव्या क्रमांकावर होती. Kia Sonet ने या कालावधीत एकूण 7,627 SUV विकल्या, हिच्याही वार्षिक विक्रीत 19.37 टक्के एवढी घट दिसून आली आहे. तसेच, Mahindra XUV 3XO विक्रीच्या बाबती सातव्या क्रमांकावर होती. Mahindra XUV 3XO ने या कालावधीत एकूण 7,238 SUV विकल्या, हिच्या वार्षिक विक्रीत 27.62 टक्के एवढी घट झाली आहे.

यानंतर, आठव्या क्रमांकावर ह्युंदाई एक्सटर, नव्व्या क्रमांकावर स्कोडा काइलाक, तर दहाव्या क्रमांकावर टोयोटा टॅसर राहिली.

Web Title: maruti suzuki brezza priced under ₹9 lakh has become the favorite of the entire country; It left behind Nexon, Punch, and Frox; Despite a decline in sales, it became No. 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.