भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक पसंती मिळवणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती सुझुकी ब्रेझा लवकरच नव्या अवतारात सादर होणार आहे. २०२६ च्या मारुती ब्रेझाचे अपडेटेड मॉडेल नुकतेच टेस्टिंगदरम्यान रस्त्यावर धावताना दिसले आहे. ही कार कॅमफ्लाज ने झाकलेली असली तरी, त्यातून काही महत्त्वाचे बदल समोर आले आहेत.
डिझाइन: समोरच्या बाजूला ग्रील आणि हेडलॅम्पमध्ये फारसा बदल नसला तरी, बाजूच्या प्रोफाईलमध्ये नवीन अलॉय व्हील्स दिसले आहेत. तसेच, गाडीच्या खालच्या बाजूला असलेल्या प्लॅस्टिक क्लॅडिंगमध्ये बदल करून गाडीला अधिक 'क्लीन' लूक देण्यात आला आहे.
टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या कारमध्ये मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन पाहायला मिळाली आहे. या स्क्रीनचे रिझोल्यूशन आणि रिस्पॉन्स टाइम पूर्वीपेक्षा अधिक चांगला असण्याची शक्यता आहे. याशिवाय, यात वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि प्रगत कनेक्टेड फीचर्स मिळतील.
सर्वात मोठा बदल म्हणजे या कारमध्ये आता ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पाहायला मिळू शकते. यामुळे हायवे ड्रायव्हिंगचा अनुभव सुधारेल आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल.
काही रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी या नवीन मॉडेलमध्ये अंडरबॉडी माउंटेड सीएनजी टँक देऊ शकते. जर असे झाले, तर सीएनजी मॉडेलमध्येही ग्राहकांना बूट स्पेस (डिक्कीची जागा) भरपूर मिळेल, ही एक मोठी दिलासा देणारी बाब ठरू शकते.
टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट यांसारख्या तगड्या स्पर्धकांशी मुकाबला करण्यासाठी मारुती सुझुकी ब्रेझामध्ये हे महत्त्वाचे बदल करत आहे. ही कार २०२६ च्या मध्याला किंवा त्यापूर्वी लाँच होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Maruti Suzuki Brezza's 2026 updated model spotted testing with design tweaks, larger infotainment screen, and possible 6-speed manual transmission. Reports suggest an underbody CNG tank, solving boot space concerns. Expected launch mid-2026 to compete with Nexon, Venue, and Sonet.
Web Summary : मारुति सुजुकी ब्रेज़ा का 2026 अपडेटेड मॉडल टेस्टिंग के दौरान दिखा। डिज़ाइन में बदलाव, बड़ा इंफोटेनमेंट स्क्रीन और 6-स्पीड मैनुअल ट्रांसमिशन की संभावना है। अंडरबॉडी सीएनजी टैंक से बूट स्पेस की समस्या हल होगी। 2026 के मध्य में लॉन्च होने की उम्मीद है।