मारुती सुझुकीच्या 'या' कारची होतेय जबरदस्त विक्री; 34 किमी मायलेजसह अनेक फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:30 IST2025-02-11T12:30:01+5:302025-02-11T12:30:32+5:30

Maruti Suzuki Alto K10 : मारुतीने अलीकडेच या कारची किंमत वाढवली होती. यानंतरही या हॅचबॅकला मोठी मागणी आहे. तर या कारची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या... 

maruti suzuki alto k10 sales report 11 thousand 352 unit sale 34 kilometer mileage  | मारुती सुझुकीच्या 'या' कारची होतेय जबरदस्त विक्री; 34 किमी मायलेजसह अनेक फीचर्स...

मारुती सुझुकीच्या 'या' कारची होतेय जबरदस्त विक्री; 34 किमी मायलेजसह अनेक फीचर्स...

Maruti Suzuki Alto K10 : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक स्वस्त आणि महागड्या कार आहेत. मात्र, ज्यावेळी सर्वात स्वस्त कारची चर्चा होते, त्यावेळी मारुती सुझुकी अल्टो K10 चे नाव सर्वात आधी घेतले जाते. अल्टो K10 कार थोडी लहान असली तरी मायलेजच्या बाबतीत खूप पसंत केली जाते. मारुतीने अलीकडेच या कारची किंमत वाढवली होती. यानंतरही या हॅचबॅकला मोठी मागणी आहे. तर या कारची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या... 

गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये या लहान हॅचबॅकच्या एकूण 11 हजार 352 युनिट्स विकल्या गेल्या. यावरून, आपण अंदाज लावता शकतो की, अल्टो K10 कार किती लोकप्रिय आहे. ही कार मारुतीच्या इतर एस-प्रेसो, सेलेरियो आणि जिम्नी या कारपेक्षा जास्त विकली जात आहे. 

आता मारुती अल्टो K10 ची किंमत 4.09 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 6.05 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर, ती STD, LXI, VXI आणि VXI Plus या चार व्हेरिएंटमध्ये मिळत आहे. कंपनीने मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये 1.0  लिटर 3 सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 66 बीएचपीची पॉवर आणि 89 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. 

यासोबतच, इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. या कारमध्ये सीएनजीचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. कंपनीच्या मते, कारचे पेट्रोल व्हेरिएंट प्रति लिटर जवळपास 25 किमी मायलेज देते. तर या कारचे सीएनजी व्हेरिएंट 33 किमी पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. 

अल्टो K10च्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने या कारमध्ये एसी, फ्रंट पॉवर विंडो, पार्किंग सेन्सर, सेंट्रल कन्सोल आर्मरेस्ट, गियर शिफ्ट इंडिकेटर, अॅडजस्टेबल हेडलॅम्प, हॅलोजन हेडलॅम्प, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्ज असे अनेक फिचर्स दिले आहेत.

Web Title: maruti suzuki alto k10 sales report 11 thousand 352 unit sale 34 kilometer mileage 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.