शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज

By हेमंत बावकर | Updated: January 25, 2020 08:54 IST

भारतात सुरक्षेपेक्षा कार किती देते याकडे पाहिले जाते. यामुळे कंपन्यांनी सुरक्षा न पाहता हलक्या वजनाच्या कार बाजारात आणायला सुरूवात केली.

ठळक मुद्दे केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून नवीन सुरक्षा नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्वाची मानण्यात आली आहे.

- हेमंत बावकरमुंबई : केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून नवीन सुरक्षा नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्वाची मानण्यात आली आहे. टाटा मोटर्सने यावर दोन कार फाईव्ह स्टार ग्लोबल एनकॅप सुरक्षा रेटिंग मिळालेल्या बाजारात आणण्याच मान मिळविला आहे. मात्र, मारुती सुझुकीला हे काही जमलेले नाही. टाटाने नुकत्याच लाँच केलेल्या अल्ट्रॉझलाही फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. यावरून मारुतीला मोठे चॅलेंज देण्यात आले आहे. 

भारतात सुरक्षेपेक्षा कार किती देते याकडे पाहिले जाते. यामुळे कंपन्यांनी सुरक्षा न पाहता हलक्या वजनाच्या कार बाजारात आणायला सुरूवात केली. यासाठी पातळ पत्रा, बॉडी कमी क्षमतेची, कमी गुणवत्तेचे फायबर अशा अनेक क्लुप्त्या वापरण्यात आल्या. यामुळे याचा थेट परिणाम प्रवाशांच्या सुरक्षेवर झाला आहे. एखादी कार समोरून येणाऱ्या वाहनाचाही आघात सहन करू शकत नाही. यामुळे काही अपघातांना कारमध्ये बसलेले अख्खेच्या अख्खे कुटुंबच ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 

यामुळे सरकारने रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी दुचाकी आणि कार कंपन्यांना नियमावली लागू केली आहे. एबीएस, पॅसेंजर एअरबॅग, रिअर कॅमेरा अशा सुरक्षेच्या काही अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, ग्लोबल एनकॅप ही संस्था जागतिक स्तरावर वाहनांची सुरक्षा तपासते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे या वाहनांचे अपघात घडविले जातात. यामध्ये सेन्सर बसविलेले असतात. मानसांच्या जागी पुतळे असतात. त्यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहिले जाते. यासाठी ठराविक वेगही असतो. यामध्ये टाटा अव्वल ठरली आहे. मात्र, देशातील आघाडीची कंपनी मारुती यामध्ये सपशेल अपयशी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी महिंद्राची एक्सयुव्ही 300 हीनेही फाईव्ह स्टार रेटिंग मिळविले आहेत. 

रश लेन या ऑटो पोर्टलने दिलेल्या महितीनुसार मारुतीची एकच कार सर्वाधिक सुरक्षा देणाऱ्या कारच्या यादीमध्ये आहे. ती म्हणजे ब्रिझा. ब्रिझाला फोर स्टार रेटिंग आहे. तर टाटाच्या पाच, महिंद्राच्या दोन, फोक्सवॅगन 1 आणि टोयोटा 1 अशा कार आहेत. सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा करणारी फोर्डही यामध्ये दिसत नाही. 

टाटा अल्ट्रॉझला लाँचिंगवेळी 5 स्टार रेटिंगचे सर्टिफिकीट देण्यात आले. यावेळी ग्लोबल एनकॅपचे कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डिव्हिड वार्ड यांनी थेट मारुतीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या कंपन्यांनी टाटा आणि महिंद्राचा आदर्श घ्यावा आणि सुरक्षित कार बनवाव्यात असा सल्ला दिला. तसेच मारुतीसाठी हे चॅलेंज असेल, असेही ते म्हणाले. एकीकडे मारुतीला फटकारताना त्यांनी फोक्सवॅगन आणि टोयोटालाही कानपिचक्या दिल्या. या जागतिक दर्जाच्या कार कंपन्यांकडे फाईव्ह स्टार सुरक्षेच्या कार भारतीय बाजारात नसाव्यात याबद्दल खेद व्यक्त केला. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाMahindraमहिंद्राMarutiमारुतीroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातFordफोर्ड