Maruti नं लॉन्च केली नवी सेडान, देईल 21Km मायलेज; सेफ्टी फीचर्स जाणून प्रेमात पडाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 21:20 IST2023-02-14T21:19:26+5:302023-02-14T21:20:12+5:30
मारुती सुझुकीने या सेडान कारमध्ये 20 हून अधिक सेफ्टी फीचर्स सामील केले आहेत.

Maruti नं लॉन्च केली नवी सेडान, देईल 21Km मायलेज; सेफ्टी फीचर्स जाणून प्रेमात पडाल!
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आज आपली मिड-साईज सेडान कार Maruti Ciaz देशांतर्गत बाजारात नव्या ड्युअल-टोन अवतारात लॉन्च केली आहे. या कारला कंपनीने नवा लुक तर दिला आहेच. शिवाय सेडानलाही पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित बनविले आहे. आकर्षक लुक आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह ही सेडान एकूण दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. हिची सुरवातीची किंमत (मॅन्युअल) 11.14 लाख रुपये तर (ऑटोमेटिक) 12.34 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी निश्चित करण्यात आली आहे.
नवी Maruti Ciaz आता तीन नव्या डुअल टोन पेंट स्कीम बरोबरच एकूण 7 मोनो टोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ही कार डुअल टोनमध्ये ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ऑप्यूलेन्ट रेड, ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ग्रँड्योर ग्रे आणि ब्लॅक रूफसह डिग्निटी ब्राऊन कलर ऑप्शनसह येते. ही कार मॅनुअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांसह बाजारात उतरवण्यात आली आहे. नव्या रंगाशिवाय, कंपनीने या सेडान कारमध्ये काही खास सेफ्टी फीचर्सदेखील सामील केले आहेत. यामुळे ही कार अधिक सुरक्षित झाली आहे.
मिळतात हे खास सेफ्टी फीचर्स -
मारुती सुझुकीने या सेडान कारमध्ये 20 हून अधिक सेफ्टी फीचर्स सामील केले आहेत. आता यात हिल-होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP) स्टँडर्ड म्हणून सामील केला आहे. जे सर्वच व्हेरिअंट्समध्ये मिळते. या शिवाय, डुअल एअरबॅग, रिअर पार्किंग सेंसर, ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशनसह (EBD) अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) आदी देण्यात आले आहे. याच बरोबर, आता ही कार प्रवाशांना अधिक सुरक्षितता प्रदान करेल, असा दावाही कंपनीने केला आहे.
पॉवर, परफॉर्मेंस आणि मायलेज -
मारुती सुझुकी सियाजच्या इंजिन मॅकनिझममध्ये कंपनीने कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. ही कार पूर्वीप्रमाणेच 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. जी 103bhp की पॉवर आणि 138Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच, हिचे मॅनुअल व्हर्जन 20.65 किलोमीटर तर ऑटोमॅटिक व्हर्जन 20.04 किलोमीटर प्रतिलीटरपर्यंतचे मायलेज देते.