Maruti Ertiga Facelift Launch Price Features: मारुतीची नवी अर्टिगा येतेय; जाणून घ्या काय काय बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:00 IST2021-12-06T18:57:37+5:302021-12-06T19:00:10+5:30
Maruti Ertiga Facelift : कोणतीही कंपनी फेसलिफ्ट मॉडेल आणते तेव्हा इंटेरिअरमध्ये व फिचर्समध्ये बदल करते. मारुती अर्टिगामध्ये लेटेस्ट फिचर्स पहायला मिळू शकतात.

Maruti Ertiga Facelift Launch Price Features: मारुतीची नवी अर्टिगा येतेय; जाणून घ्या काय काय बदलणार
भारतात लोकप्रिय असलेली मारुतीचा सात सीटर कार अर्टिगाचे नवे फेसलिफ्ट (New Maruti Ertiga) येऊ घातले आहे. अर्टिगा नवीन रंग, रुपात, स्टाईलमध्ये आणि फिचर्ससह लाँच होणार आहे. सध्याची अर्टिगादेखील आकर्षक आहे. मात्र, येणाऱ्या अर्टिगामध्ये लोक नवा एक्सपिरिअन्स घेऊ शकणार आहेत.
नुकतीच मारुती अर्टिगाच्या नव्या फेसलिफ्टची भारतात टेस्टिंग सुरु झाली आहे. याचा एक फोटो देखील समोर आला आहे. यामध्ये काही लुक आणि डिझाईनबाबत माहिती मिळते. नव्या अर्टिगाच्या लुकमध्ये फारसा बदल नाहीय. पुढे काही छोटे मोठे बदल पहायला मिळतील. मात्र, पाठीमागे खूप काही जुन्याच मॉडेलसारखे दिसणार आहे. सोबतच अलॉय व्हिल्स, रिअर बंपर जुन्या मॉडेलचाच दिसणार आहे. नव्या अर्टिगाला नव्या रंगांमध्ये लाँच केले जाणार आहे.
कोणतीही कंपनी फेसलिफ्ट मॉडेल आणते तेव्हा इंटेरिअरमध्ये व फिचर्समध्ये बदल करते. मारुती अर्टिगामध्ये लेटेस्ट फिचर्स पहायला मिळू शकतात. इंटिरिअर कलर आणि डॅशबोर्ड देखील अधिक चांगला होण्याची शक्यता आहे. 2022 Maruti Ertiga Facelift मध्ये सध्याचेच 1.5 लीटर इंजिन पहायला मिळणार आहे. माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी असणार आहे. 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटीक गिअर बॉक्स देण्यात येईल.
मारुती सुझुकीमध्ये चार व्हेरिअंट असू शकतात. सीएनजी मॉडेल नंतर आणले जाऊ शकते. या कारची किंमत 8 लाख रुपये ते 11 लाख रुपयांपर्यंत असू शकते.