सर्वात स्वस्त 7 सीटर कारला लोकांची पसंती, खूप झाली विक्री, किंमत 5 लाखांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:16 IST2022-10-12T14:15:15+5:302022-10-12T14:16:00+5:30
Maruti Eeco : कंपनीची स्वस्त कार सप्टेंबर 2022 मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार ठरली आहे. विशेष म्हणजे कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

सर्वात स्वस्त 7 सीटर कारला लोकांची पसंती, खूप झाली विक्री, किंमत 5 लाखांपेक्षा कमी
नवी दिल्ली : कार कंपन्यांसाठी सप्टेंबर महिना चांगला राहिला आहे. बहुतांश कंपन्यांनी पॉझिटिव्ह ग्रोथ नोंदवली आहे. मारुती सुझुकीची अल्टो ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. या कारच्या 24,844 युनिट्सची विक्री झाली आहे. दुसरीकडे, मारुती ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. मारुतीच्या आणखी एका कारने विक्रीचा विक्रम केला आहे. कंपनीची स्वस्त कार सप्टेंबर 2022 मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार ठरली आहे.
विशेष म्हणजे कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. दरम्यान, आपण ज्या कारबद्दल बोलत आहोत ती म्हणजे मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco). ही केवळ देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार नाही तर देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार देखील आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या कारच्या 12,697 युनिट्सची विक्री केली आहे. तर सप्टेंबर 2021 मध्ये या कारच्या 7,844 युनिट्सची विक्री झाली. अशा प्रकारे मारुती ईकोने 61 टक्के वाढ नोंदवली आहे.
मारुती ईकोची किंमत 4.63 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम 5.94 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारची लांबी 3,675 मिमी, रुंदी 1,475 मिमी आणि उंची 1,800 मिमी आहे. व्हीलबेसबद्दल बोलायचे तर ते 2,350 मिमी आहे. मारुती ईकोमध्ये ड्युअल टोन इंटीरियरसह चांगला एसी, आलिशान केबिन स्पेस, मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टम आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
पेट्रोल व्हेरिएंट 16.11kmpl मायलेज
मारुती इको वाहन पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.2-लिटर न्यॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 73PS पॉवर आणि 98Nm टॉर्क निर्माण करते. तसेच, कारचे CNG किट असलेले इंजिन 63PS पॉवर आणि 85Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की, पेट्रोल व्हेरिएंट 16.11kmpl मायलेज देते आणि CNG व्हेरिएंट 20.88kmpl मायलेज देते.