आजकाल जो तो विकेंड सुरु झाला की गाडी काढतो आणि फिरायला निघतो. अनेकदा या लोकांचे डेस्टिनेशन हे उंच डोंगराळ भाग असतो. पावसाळा असो की हिवाळा की उन्हाळा, बहुतांश लोक लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी सारखी ठिकाणे शोधू लागतात. मात्र, डोंगराळ रस्त्यांवर गाडी चालवणे हे मैदानी प्रदेशापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि आव्हानात्मक असते. यामुळे अनेकदा अपघातही झालेले आहेत. एकतर चढ-उताराचा अनुभव नसतो, त्यात गाडी अनकंट्रोल झाली तर काय करायचे हे देखील माहिती नसते. वळणावर समोरून बस किंवा ट्रक येत असेल तर काय करायचे हे देखील अनेकांना माहिती नसते. अशातच या डोंगररांगा सर करण्यासाठी एक प्रश्न नेहमी सतावतो 'मॅन्युअल कार चांगली की ऑटोमॅटिक?'
डोंगराळ भागात मॅन्युअल कार चालवणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे, कारण यात ड्रायव्हरचे गाडीवर पूर्ण नियंत्रण असते. चढणीवर योग्य वेळी लोअर गिअर टाकणे मॅन्युअल कारमध्ये सहज शक्य असते, ज्यामुळे इंजिनला अधिक ताकद मिळते. उतारावर उतरताना इंजिन ब्रेकिंगचा वापर करून ब्रेकवरचा ताण कमी करता येतो, जे मॅन्युअल कारमध्ये अधिक प्रभावी ठरते.डोंगराळ भागात क्लचचा वापर जास्त होतो, मॅन्युअल कारची दुरुस्ती ऑटोमॅटिकच्या तुलनेत स्वस्त पडते.
ऑटोमॅटिक कारचे फायदे तंत्रज्ञान बदलले तसे आता ऑटोमॅटिक कारही पर्वतांवर मागे राहिलेल्या नाहीत. वारंवार क्लच दाबणे आणि गिअर बदलण्याची कसरत करावी लागत नसल्याने ड्रायव्हरला थकवा येत नाही. आधुनिक ऑटोमॅटिक कारमध्ये 'हिल होल्ड' फिचर असते, ज्यामुळे चढणीवर गाडी मागे सरकत नाही. नवख्या ड्रायव्हर्ससाठी घाटातील वळणांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
कोणती निवडाल?जर तुम्ही अनुभवी ड्रायव्हर असाल आणि तुम्हाला गाडीवर पूर्ण ताबा हवा असेल, तर मॅन्युअल कार हा आजही सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, जर तुम्हाला प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि घाटातील ट्रॅफिकमध्ये क्लचपासून सुटका हवी असेल, तर आधुनिक ऑटोमॅटिक कार (ज्यात 'मॅन्युअल मोड' किंवा 'पॅडल शिफ्टर्स' असतील) निवडणे सोयीचे ठरेल.
Web Summary : Manual cars offer control on hills, especially for experienced drivers, while automatic cars provide comfort and ease, especially for novice drivers with features like hill hold. Choose based on experience and preference.
Web Summary : अनुभवी चालकों के लिए मैनुअल कारें बेहतर नियंत्रण प्रदान करती हैं, जबकि ऑटोमैटिक कारें आरामदायक होती हैं, खासकर नए चालकों के लिए। हिल होल्ड जैसी सुविधाओं के साथ चुनाव अनुभव और पसंद पर निर्भर करता है।