केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:28 IST2025-09-16T19:27:53+5:302025-09-16T19:28:32+5:30

citroen aircross x pre bookings open look teaserl

Make this new Dhasu SUV yours for just ₹11,000, AI assistant with 52 languages and much more; Company starts bookings | केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सिट्रोएन इंडियाने त्यांच्या अपडेटेड एअरक्रॉस X SUV (SUV Aircross X) ची प्री-बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक केवळ ११,००० रुपयांच्या टोकनसह हिची बुकिंग करू शकतात. ही कार पुढच्याच महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता असून, या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि नवीन डिझाइन्स देण्यात आले आहेत. यांपैकी काही बेसाल्ट एक्समधून घेण्यात आले आहे. जाणून घेऊयात हिची खासियत.

नवा कलर आणि एक्सटीरिअर अपडेट्स - 
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या टीझर इमेजवरून, एअरक्रॉस एक्समध्ये एक नवीन हिरव्या रंगाचा पर्याय उपलब्ध असेल, असे वाटते. याशिवाय, टेलगेटवर एक नवीन 'एक्स' बॅजिंग दिसेल. उर्वरित डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत.

केबिन आणि फीचर्स अपग्रेड - 
इंटीरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या SUV चे केबिन आणखी प्रीमियम बनवण्यात आले आहे. यात नवे लेदर-रॅप्ड डॅशबोर्ड, सॉफ्ट-टच मटेरियल, ड्युअल-टोन थीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, व्हाइट अँबियंट लाइटिंग, LED फॉग लैंप, ऑटो-डिमिंग IRVM, लेदरेट अपहोल्स्ट्री आणि ऑप्शनल 360-डिग्री कॅमेरा असेल.

AI असिस्टंन्ट -
सिट्रोएन एअरक्रॉस X मध्ये Citroen चा नवीन CARA इन-कार AI असिस्टंट देखील मिळेल. जो 52 भाषांमध्ये व्हॉइस कमांड समजू शकतो. तसेच, बेस्ट नेव्हिगेशन रूट, जवळचा इंधन पंप, डेस्टिनेशनपर्यंत डिस्टंन्स टू एम्प्टीसारखी माहितीही देईल, जी अत्यंत अॅडव्हान्स्ड आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स -
यात कसल्याही प्रकारचे मॅकेनिकल बदल अपेक्षित नाहीत. या कारमध्येही 1.2L नॅच्युरली-अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (81 bhp, 5-स्पीड गिअरबॉक्स) आणि 1.2L टर्बो-पेट्रोल इंजिन (108 bhp, 6-स्पीड मॅनुअल/टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक) ऑप्शन मिळेल.

Web Title: Make this new Dhasu SUV yours for just ₹11,000, AI assistant with 52 languages and much more; Company starts bookings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.