लॉन्चिंगपूर्वीच Mahindra XUV 7XO ची प्री-बुकिंग सूरू, जाणून फीचर्स अन् किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:48 IST2025-12-16T11:47:34+5:302025-12-16T11:48:01+5:30
महिंद्राची बहुप्रतिक्षित SUV Mahindra XUV 7XO लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे.

लॉन्चिंगपूर्वीच Mahindra XUV 7XO ची प्री-बुकिंग सूरू, जाणून फीचर्स अन् किंमत...
Mahindra XUV 7XO : महिंद्राची बहुप्रतिक्षित SUV Mahindra XUV 7XO लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. अधिकृत लॉन्चपूर्वीच या SUV ची प्री-बुकिंग सुरू करण्यात आली असून, नवीन डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे XUV 7XO ला ग्राहकांची पसंती मिळत आहे. ही SUV सध्याच्या Mahindra XUV700 चे फेसलिफ्ट आणि नव्या नावाने येणारे मॉडेल मानले जात आहे.
प्री-बुकिंग आणि लॉन्च डिटेल्स
Mahindra XUV 7XO ची प्री-बुकिंग ₹21,000 टोकन रकमेवर सुरू झाली आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत डीलरशिप किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे बुकिंग करू शकतात. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सुरुवातीच्या डिलिव्हरीमध्ये प्राधान्य मिळेल. बुकिंगदरम्यान ग्राहकांना फ्युएल टाइप, ट्रान्समिशन आणि पसंतीची डीलरशिप निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
महिंद्रा येत्या 5 जानेवारी 2025 रोजी XUV 7XO च्या किंमती जाहीर करणार असून, याच दिवशी SUV चे अधिकृत लॉन्च होणार आहे.
अधिक प्रीमियम आणि मॉडर्न लुक
Mahindra XUV 7XO च्या एक्सटीरियर डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. SUV च्या पुढील बाजूला नवीन ड्युअल-पॉड LED हेडलॅम्प्स, L-शेपचे LED DRLs देण्यात येणार असून, हा लुक सध्याच्या XUV700 पेक्षा अधिक मॉडर्न दिसतो. तर, मागील बाजुस नवीन LED टेललॅम्प्स मिळतील, जे Mahindra XEV 9S सारखे दिसतात.
याशिवाय, SUV मध्ये ब्लॅक-आउट ग्रिल, सिल्व्हर स्लॅट्स आणि नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स मिळतील. एकूणच काय, तर लुक अधिक प्रीमियम बनवण्यात आला आहे.
अधिक अॅडव्हान्स आणि फीचर-लोडेड केबिन
XUV 7XO चा केबिन आधीपेक्षा अधिक लक्झरी आणि अॅडव्हान्स असणार आहे. यात नवीन डॅशबोर्ड डिझाइन, ट्रिपल-स्क्रीन सेटअप, सॉफ्ट-टच मटेरियल, नवीन AC व्हेंट्स आणि उत्तम फिनिशिंग टच मिळेल.
इंजिन आणि गिअरबॉक्स पर्याय
Mahindra XUV 7XO मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय मिळेल. एकूणच काय, जर तुम्ही एक मोठी, स्टायलिश आणि फीचर-लोडेड SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Mahindra XUV 7XO हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.