लवकरच लॉन्च होणार 5-डोअर Mahindra Thar, टेस्टिंगदरम्यान झाली स्पॉट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 15:57 IST2023-10-29T15:57:16+5:302023-10-29T15:57:16+5:30
महिंद्रा थार घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

लवकरच लॉन्च होणार 5-डोअर Mahindra Thar, टेस्टिंगदरम्यान झाली स्पॉट...
Mahindra Thar: महिंद्रा Thar च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच थारचे अपडेटेड 5-डोअर व्हर्जन बाजारात येणार आहे. सध्या ही या गाडीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. टेस्टिंगदरम्यान ही गाडी स्पॉट झाली असून, गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नवीन स्टाइल आणि जास्त फीचर्स
रिपोर्टनुसार, थारच्या या अपडेटेड व्हर्जनमध्ये समोर चार आणि पाठीमागे एक दार मिळेल. इंटेरिअरमध्ये 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्लॅट डिझाइनसह एक आकर्षिक फ्रंट ग्रिल, एलईडी प्रोजेक्टरसह एलईडी डीआरएल हेडलॅम्पही मिळतील.
मागील बाजूस टेल-लॅम्प डिझाइनमध्ये एलईडी ग्राफिक्स मिळतील. या नवीन थारमध्ये वेगळे अलॉय व्हील डिझाइन मिळण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, यात डॅशकॅम मिळणार आहे. प्रवाशांच्या आरामासाठी आर्मरेस्टसह सनरुफ मिळण्याची अपेक्षा आहे.
ही नवीन थार पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ही SUV मारुती सुझुकी जिमनी 5-डोर आणि लवकरच येणार्या फोर्स गुरखा 5-डोरशी स्पर्धा करेल. Thar 5-door व्यतिरिक्त, कंपनी XUV300 चे नवीन मॉडेल 2024 मध्येच लॉन्च करण्याची शक्यता आहे.