शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 01:28 IST

या खास एसयूव्हीची बुकिंग १४ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल, तर डिलिव्हरी १४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल.

महिंद्राने भारतीय मोटरस्पोर्ट इतिहासात आता एक नवे पान जोडले आहे. महिंद्राने जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीमवर आधारित एसयूव्ही, महिंद्रा BE 6 फॉर्म्युला ई-एडिशन (Mahindra BE 6 Formula E Edition) लाँच केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ₹२३.६९ लाख (FE2) आणि ₹२४.४९ लाख (FE3) एवढी असेल. जागतिक फॉर्म्युला ई-सीझन ११ मध्ये चौथा क्रमांक मिळवलेल्या महिंद्रा रेसिंग (Mahindra Racing) टीमपासून प्रेरित असलेली ही पहिली रोड कार आहे.

या एसयूव्हीला फॉर्म्युला ई-प्रेरित आकर्षक फ्रंट बंपर, ग्लॉस-ब्लॅक फिनिशसह सर्क्युलर प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि फायरस्टॉर्म ऑरेंज मोटरस्पोर्ट्सचे खास एक्सेंट्स मिळतात. ही एसयूव्ही एव्हरेस्ट व्हाईट, फायरस्टॉर्म ऑरेंज, स्टील्थ ब्लॅक आणि टँगो रेड या विशेष रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात डार्क-टिंटेड R20 अलॉय व्हील्स, ऑरेंज ब्रेक कॅलिपर्स आणि फॉर्म्युला ई बॅजिंग व डिकल्स (रूफ, फेंडर, बंपरवर) देण्यात आले आहेत, ज्यामुळे ती 'रोड-रेडी इलेक्ट्रिक रेस मशीन' वाटते.

कारच्या आत Firestorm Orange थीम असून, फॉर्म्युला ई लोगो एम्बॉस्ड डॅशबोर्ड, सीट्स आणि सेंटर कन्सो मिळते. FIA ब्रँडेड सीट बेल्ट्स, ऑरेंज एक्सेंटेड स्टीअरिंग, रेस-स्टाईल फ्लॅपसह स्टार्ट/स्टॉप बटण आणि एक्सक्लुझिव्ह फॉर्म्युला ई डिजिटल स्टार्टअप ॲनिमेशनमुळे आत बसल्यावर 'इलेक्ट्रिक रेस कार'मध्ये बसल्याचा अनुभव येतो. यासंदर्भात बोलताना, महिंद्राचे अध्यक्ष आर. वेलुसामी म्हणाले, "BE 6 केवळ फ्यूचरिस्टिकच दिसत नाही, तर आत बसल्यावर रेस कारचा अनुभव देते. फॉर्म्युला ई एडिशन रेसिंगच्या याच उत्कटतेला सेलिब्रेट करते." 

या खास एसयूव्हीची बुकिंग १४ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल, तर डिलिव्हरी १४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahindra Launches World's First Formula E-Themed SUV: Price and Features

Web Summary : Mahindra unveils the BE 6 Formula E Edition SUV, inspired by its racing team. Priced from ₹23.69 lakh, it boasts Formula E-inspired design, unique colors, and interior accents. Bookings start January 2026; deliveries February 2026.
टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग