शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

SUV कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार, महिंद्राच्या ऑफर्स ऐकून तुम्हीही लगेच बुकिंग कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 19:49 IST

गेल्या काही महिन्यांत कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन कार खरेदी करणाऱ्यांमध्ये SUV खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे.

गेल्या काही महिन्यांत कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन कार खरेदी करणाऱ्यांमध्ये SUV खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत एक मोठा ट्रेंड दिसून येत आहे. तर ग्राहक छोट्या कारऐवजी मोठ्या प्रमाणात एसयूव्ही कार खरेदी करत आहेत. आता महिंद्रा कंपनीनं SUV कारसाठी मोठ्या सवलतीची घोषणा केली आहे. 

महिंद्राने ऑगस्ट 2022 साठी बंपर ऑफर आणल्या आहेत. महिंद्राची नवीन SUV कार खरेदी केल्यास ४०,००० रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. महिंद्रा XUV300, Marazzo, KUV100 NXT आणि बोलेरोच्या खरेदीवर प्रचंड सवलत देत आहे. नवीन SUV खरेदीवर तुम्हाला किती सूट मिळेल ते पाहूया.

महिंद्रा बोलेरो- २० हजार रुपये बोलेरो ही कार महिंद्राच्या लाइनअपमधील सर्वात जुनी आहे. ७ सीटर बोलेरो कारला मार्च २०२० मध्ये शेवटचं अपडेट करण्यात आलं होतं. ही SUV कार 1.5 लिटर mHawk75 डिझेल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. बोलेरो खरेदी केल्यावर तुम्हाला 10,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज मिळतील. अशा प्रकारे बोलेरो खरेदी करून तुम्ही 20,000 रुपये वाचवू शकता.

महिंद्रा KUV100 NXT- २५ हजार रुपयेMahindra KUV100 NXT ही कंपनीची सर्वात छोटी SUV कार आहे. ही कार एसयूव्हीपेक्षा हॅचबॅकसारखी आहे. KUV100 NXT ही सहा सीटर कार आहे. सेगमेंट आणि किमतीसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. महिंद्राने या SUV वर 25,000 रुपयांची सूट दिली आहे. यामध्ये 15,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजचा समावेश आहे.

महिंद्रा Marazzo- २५ हजार रुपयेमहिंद्रा मराझो इंटिरिअर स्पेससाठी ओळखली जाते. ही SUV 6 आणि 7 सीटर पर्यायांसह येते. Marazzo खरेदीवर तुम्हाला 25,000 रुपयांची सूट मिळेल. ही कार 1.5 लीटर डिझेल इंजिनसह येते, जी 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. तुम्ही ही SUV कार खरेदी केल्यास, महिंद्र तुम्हाला निवडक व्हेरियंटवर रु. 25,000 ची रोख सूट देईल.

महिंद्रा XUV300- ४० हजार रुपयेमहिंद्रानं ऑगस्ट २०२२ साठी सर्वात जास्त डिस्काऊंट XUV300 वर दिला आहे. महिंद्रा एसयूव्ही XUV300 वर कंपनीनं ४० हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. जर तुम्ही SUV कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर एक्सयूव्ही ३०० कार घेऊन तुम्ही ४० हजारांची बजत करू शकता. सवलतीच्या ऑफरमध्ये 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज आणि 30,000 रुपयांच्या रोख सूट ऑफरचा समावेश आहे.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहन