आयपीएलच्या हंगामात महेंद्रसिंग धोनीला मिळाली नवी कोरी कार; पहा कोणती? धोनीच्या ताफ्यात दिसणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:56 IST2025-04-10T13:55:47+5:302025-04-10T13:56:05+5:30
MS Dhoni new Car: गेल्या काही वर्षांपासून भारतात पाय रोवू पाहणारी फ्रेंच कंपनी सिट्रॉएनने आपल्या तीन कारचा पोर्टफोलिओ अपडेट केला आहे.

आयपीएलच्या हंगामात महेंद्रसिंग धोनीला मिळाली नवी कोरी कार; पहा कोणती? धोनीच्या ताफ्यात दिसणार...
गेल्या काही वर्षांपासून भारतात पाय रोवू पाहणारी फ्रेंच कंपनी सिट्रॉएनने आपल्या तीन कारचा पोर्टफोलिओ अपडेट केला आहे. या पैकीच एक कार प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी याला देण्यात आली आहे. बसाल्ट डार्क एडिशनच्या पहिल्या कारची चावी त्याला देण्यात आली.
सिट्रॉएनने हॅचबॅक सी३, कुपे स्टाईल एसयुव्ही बसाल्ट आणि पाच-सात सीटर एमपीव्ही एअरक्रॉस या कारचे डार्क एडिशन लाँच केले. यावेळी कंपनीचा ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून धोनी आला होता. धोनीला सोबत घेऊनही कंपनीच्या विक्रीत फारकाही फरक पडलेला नाही.
डार्क एडशनच्या किंमती या सामान्य मॉडेलपेक्षा जवळपास १९५०० रुपयांनी जास्त असणार आहेत. या कारच्या रंगावरूनच ही कार स्पेशल एडिशन असेल हे समजणार आहे. या कारचा बाहेरील भाग हा पर्ला नेरा काळ्या रंगात आहे. बंपर आणि दरवाजाच्या हँडलवर चमकदार काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.
केबिनही कार्बन ब्लॅक इंटेरिअरची आहे. लाल रंगाचे डिटेलिंग देण्यात आले आहे. सिट्रोएन एअरक्रॉस डार्कची किंमत 13,13,300 रुपये आहे. ही कार १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येते. तर सिट्रोएन बसाल्ट २ लिटर पेट्रोल इंजिनसह येते, तिची किंमत 12,80,000 रुपये आहे. तर सी ३ ची किंमत 8,38,300 रुपये आहे.
टाटा, एमजी सारख्या अन्य कंपन्या देखील डार्क एडिशन काढून आपल्या कारचा पोर्टफोलिओ रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करतात. यात फार काही वेगळे नसते, फक्त रंग संगती काळी केली जाते. यामुळे ही कार इतर कारमध्ये उठून दिसते. परंतू, हा काळा रंग मेंटेन ठेवणे देखील एक जिकीरीचे काम असते. ज्या लोकांना हा रंग आवडतो तेच लोक या रंगाची कार खरेदी करतात.