शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

दणक्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत LML; कंपनी Electric Scooter लाँच करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 19:06 IST

दुचाकीचं उत्पादन करणारी स्वदेशी कंपनी LML नं भारतीय टू व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची केलीये घोषणा.

ठळक मुद्देदुचाकीचं उत्पादन करणारी स्वदेशी कंपनी LML नं भारतीय टू व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची केलीये घोषणा.

दुचाकी उत्पादक स्वदेशी कंपनी एलएमएलनं (LML) भारतीय टु व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केली आहे. एका जबरदस्त प्रोडक्टसह कंपनी इलेक्ट्रीक टू व्हिलर मार्केटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. या प्रसिद्ध स्कूटरचं नाव LML इलेक्ट्रीक असंच असेल. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार सध्या LML इलेक्ट्रीक सध्या नव्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीवर काम करत आहे.

"आम्ही दणक्यात पुनरागमन करण्यासाठी उत्साहित आहोत. एक हायली इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आणण्यासाठी आम्ही सक्रियपणे डेव्हलपमेंट स्ट्रॅटजीवर काम करत आहोत. आमचा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट नव्या तंत्रज्ञानानं युक्त असेल आणि अर्बन मोबिलिटी स्पेसला मजबूती देईल," अशी प्रतिक्रिया LML इलेक्ट्रीकचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ योगेश भाटीया यांनी दिली. 

LML नं Vespa सोबत आणले नवे प्रोडक्टउत्तर प्रदेशातील कानपूरमधील LML ब्रान्ड स्कूटर्स, मोटरसायकल आणि मोपेडसह स्पेअर पार्ट्स आणि अॅक्सेससरीज तयार करण्यासाठी प्रसिद्ध होती. 1972 मध्ये सुरू करण्यात आलेल्या LML 1983 मध्ये पियाजिओ वेस्पा इटलीसोबत करार केला होता. तसंच 100cc स्कूटरचं उत्पादन सुरू केलं होतं. पियाजिओनं LML कंपनीमध्ये 25.50 टक्के हिस्साही खरेदी केला होता. दोन्ही कंपन्यांनी अनेक करार केले होते. परंतु ते 1999 मध्ये पूर्ण झाले. LML नं  अॅड्रिनो, एनर्जी आणि फ्रिडमसह अनेक दुचाकी भारतात लाँच केल्या. परंतु त्यांची हवी तितकी छाप पडली नाही. 

परंतु आता कंपनी इलेक्ट्रीक टू व्हिलर सेगमेंटवर तेजीनं काम करत आहे. अनेक ब्रान्ड्सची यात एन्ट्री झाली आहे. LML भारतीय बाजारपेठेत प्रीमिअम इलेक्ट्रीक स्कूटर आणू शकते. कंपनीचा या स्कूटरची स्पर्धा बजाज चेतक इलेक्ट्रीक, TVS iQube, Ather 450X, ओला S1 आणि Simple One सारख्या स्कूटर्ससोबत असेल. 

 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेडIndiaभारत