केटीएमची 125 सीसी बाईक भारतात लाँच; किंमत नव्या आयफोनएवढी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 19:55 IST2019-06-19T19:54:55+5:302019-06-19T19:55:34+5:30
KTM RC 125 ABS मोटारसायकलची बुकिंग सुरु झाली असून विक्री जूनच्या शेवटी सुरु केली जाणार आहे.

केटीएमची 125 सीसी बाईक भारतात लाँच; किंमत नव्या आयफोनएवढी
केटीएमने भारतात 125 सीसीची बाईक लाँच केली असून एक्सशोरुम किंमत 1.47 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
KTM RC 125 ABS मोटारसायकलची बुकिंग सुरु झाली असून विक्री जूनच्या शेवटी सुरु केली जाणार आहे. या मोटारसायकलचे डिझाईन मोटोजीपी मशीन KTM RC16 वरून प्रेरित आहे. RC 125 ही बाईक फुल फेअरिंगची मोटारसायकल असून स्टील ट्रेलिस फ्रेम, फॉर्क आणि ट्रिपल क्लॅप हँडलबार दिला आहे. भारतीय बाजारात ही बाईक दोन रंगात उपलब्ध असणार आहे.
या बाईकमध्ये 17 इंचाचे टायर देण्यात आले आहेत. या बाईकला 9.5 लीटरचा पेट्रोल टँक देण्यात आला आहे. 124.7 सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन असून यामध्ये 4 व्हॉल्व, DOHC आणि लिक्विड कूल्ड फ्युअल इंजेक्शन आदी प्रणाली वापरण्यात आली आहे. हे इंजिन 14.5 पीएस ताकद आणि 12 एनएमचा टॉर्क तयार करते. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन युक्त आहे.
KTM RC 125 ABS मध्ये पुढे टेलिस्कोपिक फोर्क देण्यात आले असून पाठीमागे मोनोशॉकसोबत 10 स्टेप्स अॅडजेस्टर स्लॉट्स देण्यात आला आहे.
KTM RC 125 ABS मध्ये पुढे 300 मिमी डिस्कब्रेक देण्यात आले आहे. तर पाठीमागे 230 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तर Bosch चा सिंगल चॅनेल एबीएस देण्यात आला आहे. ट्विन प्रोजेक्टर हेडलँप्स सोबत डे टाईम रनिंग लँम्प्स आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल देण्यात आला आहे.