शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:38 IST

तर जाणून घेऊया या एसयूव्ही संदर्भात सविस्तर...

भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री सातत्याने वाढत आहे. मात्र असे असतानाही, जुलै २०२५ मध्ये, किआच्या EV६ आणि EV९ या दोन प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्हींना बाजारात एकही ग्राहक मिळाला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारतात लाँच झाल्यापासून EV६ ही एक स्टायलिश आणि हाय-परफॉर्मन्स EV म्हणून ओळखली जाते. महत्वाचे म्हणजे, एक वर्षापूर्वी म्हणजेच जुलै २०२४ मध्ये २२ लोकांनी EV६ खरेदी केली होती. याशिवाय, EV९ही कंपनीची एक प्रमुख इलेक्ट्रिक एसयूव्ही (फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही) आहे. तर जाणून घेऊया या एसयूव्ही संदर्भात सविस्तर...रेंज ६०० किमी हून अधिक - किआ EV६ सोबत ७७.४kWh बॅटरी पॅक मिळतो, जो एका चार्जमध्ये सुमारे ६६३ किमीची (ARAI) रेंज देतो. महत्वाचे म्हणजे, ही ईव्ही ० ते १०० kmph चा स्पीड, केवळ ५.२ सेकंदांत धारण करते. फीचर्स संदर्भात बोलायचे झाल्यास, कारमध्ये पॅनोरॅमिक कर्व्हड डिस्प्ले, ड्युअल १२.३-इंच स्क्रीन, १४-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ADAS लेव्हल-२ सारख्या सेफ्टी टेक्नोलॉजीचा समावेश आहे. बाजारात Kia EV६ ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ६५ लाख रुपयांपासून सुरू होते.

किआ EV९ ची किंमत किती? -किआ EV९ संदर्भात बोलायचे झाल्यास, ही एक ७-सीटर इलेक्ट्रिक SUV असून हिला ९९.८kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार सुमारे ५४१ किमीची रेंज देते. या कारचे डिझाईन फ्यूचरिस्टिक असून, कारला फ्लश डोअर हँडल, एलईडी लाईट सिग्नेचर आणि प्रीमियम केबिन देण्यात आले आहे. फीचर्समध्ये ३-रो सीटिंग, ३-रो सीटिंग, ड्युअल टचस्क्रीन सेटअप, पॅनोरॅमिक सनरूफ, ३६०-डिग्री कॅमेरा आणि अॅडव्हॉन्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमचा समावेश आहे. किआ EV९ ची एक्स-शोरूम किंमत साधारणपणे १.३० कोटी रुपये एवढी आहे. 

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार