या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:05 IST2025-11-27T16:05:18+5:302025-11-27T16:05:41+5:30
MG Cyberster Price: जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने जुलै महिन्यात लाँच केलेल्या सायबरस्टर कन्व्हर्टिबल ईव्हीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
भारतीय बाजारपेठेत स्पोर्ट्स कार सेगमेंटमध्ये एमजी सायबरस्टर या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारने अक्षरशः तहलका माजवला आहे. अर्थात सगळेच काही ही कार घेऊ शकत नाहीत, कारण ती महागडी आहे आणि दोघांनाच बसण्यासारखी आहे. म्हणजेच ती करोडपती, अब्जाधीशच शौक म्हणून घेऊ शकतात. परंतू, या महागड्या कारसाठी देखील या लोकांना चार-पाच महिन्यांचे वेटिंग करावे लागत आहे.
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने जुलै महिन्यात लाँच केलेल्या सायबरस्टर कन्व्हर्टिबल ईव्हीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाँच झाल्यापासून आतापर्यंत ३५० हून अधिक सायबरस्टर युनिट्सची विक्री झाली आहे. परिणामी, या कारसाठी ग्राहकांना ४ ते ५ महिन्यांपर्यंतचा वेटिंग पीरियड दिला जात आहे. या प्रचंड मागणीमुळे सायबरस्टर ही भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी स्पोर्ट्स कार बनली आहे.
एमजी सायबरस्टरची किंमत ७४.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार केवळ लूक आणि फीचर्समुळे नाही, तर तिच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे चर्चेत आहे. यामध्ये डुअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम आहे, जी ५१० PS ची पॉवर आणि ७२५ Nm टॉर्क जनरेट करते. ही कार अवघ्या ३.२ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी प्रतितासचा वेग पकडते.
बॅटरी आणि रेंज
सायबरस्टरमध्ये ७७ kWh ची बॅटरी देण्यात आली असून, ती एका चार्जिंगमध्ये ५८० किलोमीटरपर्यंतची रेंज देते. क्रिकेटपटू शेफाली वर्माने देखील ती नुकतीच खरेदी केली आहे.