भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:58 IST2025-07-26T14:57:30+5:302025-07-26T14:58:35+5:30
FTA मुळे भारत आणि ब्रिटनमधील व्यापार वाढेल आणि ग्राहकांना कमी किमतीत महागड्या कार मिळू शकतील.

भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
भारत आणि ब्रिटेनने नुकत्याच एका मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे आता ब्रिटनमधून कार खरेदी करण्याची इच्छा असेल, लोकांना या कराराचा थेट फायदा मिळणार आहे. या कारवर आधी 110% इंपोर्ट ड्यूटी लगत होती. मात्र आता ती कमी होऊन केवळ 10% वर येईल. खरे तर, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे जागतिक व्यापार काही प्रमाणावर अस्थिर झाला असतानाच अशा हा करार झाला आहे. FTA मुळे भारत आणि ब्रिटनमधील व्यापार वाढेल आणि ग्राहकांना कमी किमतीत महागड्या कार मिळू शकतील.
या वाहनांना होणार फादा -
खरे तर, या मुक्त व्यापार करारांतर्गत (FTA) केवळ ९३.५ लाख रुपयांपेक्षा अधिक (सुमारे £८०,०००) महाग असणाऱ्या ब्रिटिश लक्झरी कारनाच आयात शुल्कात सूट मिळेल. अर्थात आता, लँड रोव्हर, बेंटले, अॅस्टन मार्टिन, लोटस, रोल्स-रॉइस, मॅकलरेन आणि जॅग्वार सारख्या महागड्या गाड्या भारतात काही प्रमाणात स्वस्त होऊ शकतात. मात्र, £४०,००० (सुमारे ४६.५ लाख रुपये) पेक्षा कमी किमतीच्या लहान आणि मध्यम आकाराच्या वाहनांना ही सूट असणार नाही. असे यासाठी करण्यात आले, जेणेकरून भारतीय कार उद्योगाचे नुकसान होऊ नये आणि त्यांना देशांतर्गत बाजारपेठेत अधिक फायदा व्हावा.
महत्वाचे म्हणजे, या एफटीए (मुक्त व्यापार करार) मधील एक महत्त्वाची अट अशीही आहे की, पहिल्या ५ वर्षांसाठी, इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि हायड्रोजन वाहनांना कोणत्याही प्रकारची शुल्क सूट दिली जाणार नाही.
नव्या धोरणात किती असणार आयात शुल्क ? -
आतापर्यंत, ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या लक्झरी कारवर ११०% पर्यंत आयात शुल्क आकारले जात होते, ज्यामुळे त्यांची किंमत जवळजवळ दुप्पट होत होती, परंतु या नवीन एफटीए करारानंतर, काही निवडक महागड्या कारवर आता केवळ १०% एवढेच आयात शुल्क आकारले जाईल. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी या कार अधिक परवडणाऱ्या आणि किफायतशीर होऊ शकतात.