शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

1972 मध्ये किती रुपयांना मिळायची Ambassador कार? किंमत व्हायरल, आनंद महिंद्राही अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 17:47 IST

मारुती सुझुकी आल्यानंतर, या कारची लोकप्रियता कमी झाली आणि 2014 मध्ये हिचे प्रोडक्शन बंद झाले. मात्र, आजही या कारचे कौतुक केले जाते.

एके काळी अ‍ॅम्बेसेडर कार अत्यंत प्रसिद्ध होती. अगदी राजकीय मंडळींपासून ते प्रशासनातील लोकांपर्यंत आणि चित्रपट सृष्टीपर्यंतही ही कार वापरली गेली आहे. आजही अनेक लोकांकडे ही कार दिसून येते. हिंदुस्तान मोटर्सने 1957 मध्ये Ambassador Car बाजारात उतरवली होती. ही कार एका ब्रिटिश कारवर बेस्ड होती. या कारने 80 च्या दशकापर्यंत लोकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र, मारुती सुझुकी आल्यानंतर, या कारची लोकप्रियता कमी झाली आणि 2014 मध्ये हिचे प्रोडक्शन बंद झाले. मात्र, आजही या कारचे कौतुक केले जाते.

किती होती Ambassador ची किंमत -सध्या सोशल मीडियावर 1972 मधील अ‍ॅम्बेसडर कारच्या किंमतीचा फोटो व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे हा फोटो आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पोस्ट केला आहे. खरे तर ही 50 वर्षांपूर्वीची अर्थात 25 जानेवारी, 1972 रोजीची एक बातमी आहे. या बातमीचे हिडिंग, "कारची किंमत वाढली," अशी आहे. ही बातमी वाचल्यानंतर समजते, की 1972 मध्ये अ‍ॅम्बेसडर कारची किंमत 127 रुपयांनी वाढून 16,946 रुपये झाली होती. ही किंमत वाचून सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे. स्वतः आनंद महिंद्रा यांनीही असेच म्हटले आहे.

Anand Mahindra झाले अवाक -यासंदर्भात आनंद महिंद्रा यांनी, "याने माझ्या 'रविवारच्या आठवणी' ताज्या केल्या. तेव्हा मी जेजे कॉलेजमध्ये होतो. बसने जात होतो. मात्र माझ्या आईने कधी कधी मला आमची निळ्या रंगाची फिएट गाडी चलविण्याची परवानगी दिली होती. पण तेव्हा हिची किंमत एवढी असेल यावर माझा क्वचितच विश्वास बसेल," अशा आशयाचे ट्विट केले आहे.

तरीही लोकांना वाटली महाग - एका युजरने पोस्टमध्ये कमेंट करत म्हटले आहे, "1972 मध्ये माझ्या वडिलांनी ऑन रोड 18000 रुपयांत एक अ‍ॅम्बेसेडर कार घेतली होती." आणखी एका युजरने लिहिले, "ही महागडी आहे." आणखी एका युजरने, भारतीय रुपयाच्या घसरणीवर चिंता व्यक्त केली. एकाने लिहिले, "मी बघू शकतो, की वेळेनुसार रुपयाची किंमत कशा प्रकारे कमी होत आहे. आज 15,000 रुपयांत आपल्याला कारचे दोन टायरच मिळतात. मात्र ते 15,000 जर सोन्यात टाकले असते, तर आपल्याला एक कार मिळाली असती.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राcarकारAutomobileवाहन