वाटेतच पेट्रोल संपले तर...; हे इमर्जन्सी नंबर सेव्ह करून ठेवा, लागलीच मदत मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 05:06 PM2023-12-07T17:06:42+5:302023-12-07T17:07:00+5:30

हे इमर्जन्सी नंबर लक्षात ठेवा. लागलीच मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल. नॅशनल हायवेंवर तुम्हाला काही सुविधा मोफत मिळतात.

If you run out of petrol on the way...; Save this emergency number for immediate help national Highway | वाटेतच पेट्रोल संपले तर...; हे इमर्जन्सी नंबर सेव्ह करून ठेवा, लागलीच मदत मिळेल

वाटेतच पेट्रोल संपले तर...; हे इमर्जन्सी नंबर सेव्ह करून ठेवा, लागलीच मदत मिळेल

कुटुंबासोबत किंवा एकटे प्रवासाला निघाला आहात आणि दूर दूरवर पेट्रोल पंप नाहीय, तुमच्या वाहनातील इंधन संपले किंवा अपघात झाला किंवा नादुरुस्त झाले तर राष्ट्रीय हायवेवर कोणा कुणाचे नसते. अशावेळी काय कराल? हे इमर्जन्सी नंबर लक्षात ठेवा. लागलीच मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल. 
नॅशनल हायवेंवर तुम्हाला काही सुविधा मोफत मिळतात. तुम्ही अनेक रस्त्यांवर टोल भरता. त्याचा वापर करा. टोल कंपन्या काही सेवा देखील देतात. परंतू, तुम्हाला याची माहिती असली पाहिजे. 

हायवेवरून जात असताना गाडीतील इंधन संपले तर गाडी साईडला लावा आणि टोल पावती हातात घ्या. त्यावर हेल्पलाईन नंबर दिलेला असतो. किंवा पेट्रोल नंबरही असतो. तुम्हाला काही लीटर पेट्रोल किंवा डिझेलची मदत केली जाईल. यासाठी तुम्हाला जादा पैसे मोजावे लागत नाहीत, तर पेट्रोलचे पैसे द्यावे लागतात. या मदतीसाठी तुम्ही 8577051000, 7237999944 या क्रमांकांवर फोन करू शकता. 

टोल हायवेवर वाहन नादुरुस्त झाले तर तुम्ही मॅकॅनिकची मदत घेऊ शकता. यासाठी 8577051000, 7237999955 हे हेल्पलाईन नंबर आहेत. मॅकॅनिक येण्याची सेवा मोफत आहे, परंतू दुरुस्त करण्याचा चार्ज घेतला जातो. तिथे दुरुस्त झाली नाही तर वाहन टो करून नेले जाते. याचाही खर्च असतो. 

मेडिकल इमर्जन्सी
प्रवासावेळी कोणी आजारी पडले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेला 8577051000 आणि 7237999911 या हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करून तुम्ही मोफत रुग्णवाहिका मिळवू शकता. प्राथमिक उपचारासाठी देखील ही सोय आहे. 

वाटेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास, तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाइन क्रमांक 1033 किंवा 108 वर कॉल करू शकता. ही सेवा 24 तास सुरु असते. 
 

Web Title: If you run out of petrol on the way...; Save this emergency number for immediate help national Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.