थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
By जयदीप दाभोळकर | Updated: December 29, 2025 09:52 IST2025-12-29T09:51:55+5:302025-12-29T09:52:53+5:30
Anti Fog Visor Helmates: कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यात मोटरसायकल चालवणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. या हवामानात बाईक रायडर्सना ज्या सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, ती म्हणजे हेल्मेटच्या वाइजरवर जमा होणारं धुकं किंवा वाफ.

थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
Anti Fog Visor Helmates: कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यात मोटरसायकल चालवणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. या हवामानात बाईक रायडर्सना ज्या सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, ती म्हणजे हेल्मेटच्या वाइजरवर जमा होणारं धुकं किंवा वाफ. तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्हाला हे चांगलंच ठाऊक असेल. एक तर धुक्यामुळे रस्त्यावरील विझिबिलिटी आधीच कमी असते, त्यात हेल्मेटच्या काचेवर धुकं जमा झाल्यामुळे समोरचं दिसणं जवळपास अशक्य होतं. यामुळे अपघाताची शक्यता वाढते. म्हणूनच, थंडीत मोटरसायकल चालवताना 'अँटी-फॉग वाइजर' हेल्मेट्स खूप कामी येतात. ही हेल्मेट्स तुम्हाला अशा समस्यांपासून वाचवतात.
अँटी-फॉग वाइजरची गरज
मोटरसायकल चालवताना जेव्हा आपण श्वास सोडतो, तेव्हा शरीरातील उष्ण हवा हेल्मेटच्या काचेवर आदळते आणि ती काच धुरकट होते. यामुळे समोर पाहणं कठीण होतं आणि अपघाताचा धोका वाढतो. या समस्येवर अँटी-फॉग वाइजर हेल्मेट्स हा कायमस्वरूपी उपाय आहे. सामान्य हेल्मेटच्या काचेवर तापमानातील फरकामुळे ओलावा किंवा धुकं जमा होते, परंतु अँटी-फॉग वाइजरची रचना अशा प्रकारे केलेली असते की त्यावर ओलाव्याचे थेंब जमा होऊ शकत नाहीत. यामुळे रायडरला रस्ता अगदी स्पष्ट दिसतो आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित होतो.

अँटी-फॉग वाइजर हेल्मेट्सची फीचर्स आणि फायदे
या हेल्मेटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे धुक्यात किंवा पावसातही तुमची विझिबलिटी एकदम स्पष्ट राहते. तुम्हाला वारंवार थांबून काच साफ करण्याची गरज पडत नाही. तसेच, हे हेल्मेट थंडीपासूनही संरक्षण करतं. जेव्हा सामान्य हेल्मेटवर वाफ जमा होते, तेव्हा रायडरला नाईलाजानं वाइजर थोडे उघडावे लागते, ज्यामुळे बोचरी हवा थेट चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर लागते. अँटी-फॉग हेल्मेटमुळे तुम्ही काच पूर्णपणे बंद ठेवून आरामात प्रवास करू शकता.
स्वच्छता आणि काळजी घेण्याची पद्धती
हे हेल्मेट्स स्वच्छ करणं अत्यंत सोपं आहे. ते साफ करण्यासाठी नेहमी 'मायक्रोफायबर' कापडाचाच वापर करावा. हेल्मेटची काच म्हणजेच वाइजर साफ करण्यासाठी हार्ड केमिकल, साबण किंवा कॉलीन सारख्या स्प्रेचा वापर टाळावा. साधं पाणी स्वच्छतेसाठी सर्वात उत्तम आहे. तुम्ही साध्या पाण्यात कापड ओलं करूनही ते साफ करू शकता.

कोणासाठी आहे फायदेशीर आणि कुठे मिळेल?
ज्यांना पहाटे लवकर किंवा उशिरा रात्री धुक्यातून बाईक चालवावी लागते, त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाचे अँटी-फॉग हेल्मेट खरेदी करणे ही एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते. हे केवळ तुमचा प्रवास सुखावह करत नाही, तर रस्त्यावरील तुमची सुरक्षाही सुनिश्चित करते. भारतात स्टीलबर्ड, स्टड्स आणि टीव्हीएस यांसारख्या अनेक कंपन्या अँटी-फॉग वाइजर हेल्मेट्स तयार करतात, जे गुणवत्तेच्या बाबतीत उत्कृष्ट असतात. तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानातून किंवा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून हे हेल्मेट खरेदी करू शकता.