पुन्हा एकदा मनं जिंकण्यासाठी नव्या अवतारात लॉन्च होणार ही पॉप्युलर कार, समोर आली नवी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 20:57 IST2022-04-11T20:56:14+5:302022-04-11T20:57:54+5:30
2022 ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे.

पुन्हा एकदा मनं जिंकण्यासाठी नव्या अवतारात लॉन्च होणार ही पॉप्युलर कार, समोर आली नवी माहिती
Hyundai India ने नुकतीच क्रेटा नाईट एडिशन लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.35 लाख रुपये एवढी आहे. यानंतर कंपनी आता नवी ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट आणि व्हेन्यू एन-लाईन लॉन्च करण्याची शक्यता आहे. या दोन्ही गाड्या सध्या टेस्टिंगच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. या गाड्यांच्या टेस्टिंग दरम्यानचे स्पाय फोटोज आणि व्हिडिओ यापूर्वी अनेक वेळा समोर आले आहेत. हे पाहता, 2022 ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे.
नवे हेडलॅम्प आणि अपडेटेड बम्पर -
या कारच्या समोरील बाजूस काही खास बदल दिसू शकतात. नव्या व्हेन्यूमध्ये नव्या जनरेशनची टक्सन एसयूव्हीसारखी पॅरामेट्रिक ज्वेल थीम असलेली ग्रिल आणि एलईडी डीआरएल दिसेल. याशिवाय, या कारला नवे डिझाईन केलेले हेडलॅम्प आणि अपडेटेड बम्परही असतील. याच बरोबर अलॉय व्हील्सचा नवा सेट आणि अपडेटेड टी-शेप्ड रॅपराउंड एलईडी टेललॅप्सदिले जातील.
हे फीचर्स देखील असणार -
नव्या 2022 Hyundai Venue फेसलिफ्टचे नवी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आणखी विशेष स्वरुपात येण्याची शक्यता आहे. फ्लॅट बॉटम लेदर रॅप्ड स्टीअरिंग व्हील, नवे ब्ल्यूलिंक कनेक्टेड कार टेक, वायरलेस चार्जर, 6-स्पीकर ऑडियो सिस्टिम आणि नवे अपहोल्स्ट्री सारखे फीचर्सदेखील बघायला मिळू शकतात.