Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 12:56 IST2025-05-18T12:55:09+5:302025-05-18T12:56:16+5:30

Hyundai Upcoming Cars: ह्युंदाई लवकरच भारतीय बाजारात 26 नवीन कार लॉन्च करणार आहे.

Hyundai Upcoming Cars: Hyundai has a big plan! 20 petrol-diesel and 6 EV cars to be launched in India | Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

Hyundai Upcoming Cars: साउथ कोरियन कार कंपनी Hyundai ने भारतीय बाजारपेठेसाठी मोठी योजना आखली आहे. भविष्यातील योजना जाहीर करताना, कंपनीने म्हटले की, ती आर्थिक वर्ष 30 पर्यंत कंपनी भारतीय बाजारात 26 नवीन कार मॉडेल्स लॉन्च करणार आहे. यामध्ये 20 (ICE) पेट्रोल-डिझेल वाहने आणि 6 इलेक्ट्रिक वाहने (EV) असतील.

एसयूव्हींना प्रचंड मागणी:
कंपनीने म्हटले की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन ह्युंदाई वाहनांपैकी दोन स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्स (एसयूव्ही) आहेत. अशा परिस्थितीत, भविष्यात ह्युंदाईचे लक्ष एसयूव्ही कारवर असेल असे मानले जाते. ह्युंदाई मोटर इंडियाचे म्हणणे आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये देशांतर्गत बाजारात एकूण 5,98,666 कार विकल्या आहेत. ज्यामध्ये एसयूव्ही वाहनांचा वाटा 68.52% (4,10,200 युनिट्स) होता.

विशेष म्हणजे, 26 पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक मॉडेल्स व्यतिरिक्त, ह्युंदाई भारतात हायब्रिड वाहने देखील सादर करणार आहे. सध्या ह्युंदाईच्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये ग्रँड आय10 निओस, आय20, आय20 एन लाईन, ऑरा, व्हेर्ना, एक्सटर, व्हेन्यू, व्हेन्यू एन लाईन, क्रेटा, क्रेटा एन लाईन, अल्काझर, टक्सन, क्रेटा इलेक्ट्रिक आणि आयोनिक 5 (ईव्ही) सारखे मॉडेल आहेत.

कंपनीने काय म्हटले?
ह्युंदाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अन्सू किम म्हणाले, ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आम्हाला विश्वास आहे की, एसयूव्ही पॅसेंजर व्हेईकल (पीव्ही) सेगमेंट बाजारपेठेत वर्चस्व गाजवत राहील. भविष्यात आम्ही आमचा एसयूव्ही शेअर वाढवण्यावर, तसेच तो अधिक प्रीमियम बनवण्यावर लक्ष केंद्रित करू. येत्या काळात आपण पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढवू.

ह्युंदाईला मारुतीचे आव्हान
मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. गेल्या काही महिन्यांत टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांच्यातील स्पर्धेमुळे कंपनीला फटका बसत आहे. यामुळेच ह्युंदाई भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. 

Web Title: Hyundai Upcoming Cars: Hyundai has a big plan! 20 petrol-diesel and 6 EV cars to be launched in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.