Hyundai Stargazer: Hyundai लॉन्च करणार सर्वात स्वस्त 7-सीटर कार, Ertiga आणि Carens सोबत टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:56 IST2022-04-01T19:56:17+5:302022-04-01T19:56:25+5:30
Hyundai Stargazer:MPV सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्यासाठी Hyundai India स्वस्त 7-सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Hyundai Stargazer: Hyundai लॉन्च करणार सर्वात स्वस्त 7-सीटर कार, Ertiga आणि Carens सोबत टक्कर
Hyundai Stargazer: 7-सीटर MPV सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी एर्टिगाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. परवडणाऱ्या किंमती एर्टिगा(Ertiga ) ही एकमेव MPV आहे. पण आता वातावरण बदलले आहे. अलीकडे Kia India ने भारतात परवडणारी 7-सीटर कार्नेस (Carens) MPV लाँच केली. पण, आता Kia नंतर Hyundai देखील भारतीय बाजारपेठेत Stargazer नावाची एक नवीन 7-सीटर MPV आणण्याचा विचार करत आहे. टेस्टींगदरम्यान अनेकदा या कारचे फोटो समोर आले आहेत.
Hyundai ने सध्या या MPV बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. MPV सेगमेंटमध्ये, Hyundai Stargazer ची थेट स्पर्धा Maruti Suzuki Ertiga आणि Kia Carence शी असेल. Kia Carens प्रमाणेच Hyundai Stargazer ला खास MPV शैली आणि डिझाइन देण्यात आले आहे.
MPV ची वैशिष्ट्ये कशी असतील
Hyundai Stargazer च्या वैशिष्ट्यांमध्ये स्प्लिट हेडलॅम्प, LED DRLs आणि टेपरिंग प्रोफाइल असेल. एमपीव्हीच्या मागील बाजूस त्रिकोणी आकाराचे टेललॅम्प देण्यात आले आहेत. याशिवाय, ही 7-सीटर कार 1.5-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह लॉन्च होऊ शकते. दरम्यान, कंपनीकडून याबाबत कुठलीच माहिती देण्यात आली नाही. पण, याची किंमत एर्टिगा आणि कार्नेसपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे.