Hyundai IONIQ 5 in India: ह्युंदाईची इलेक्ट्रीक कार येतेय; नवीन पर्याय, चारही चाकांना ताकद मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 03:29 PM2022-04-27T15:29:12+5:302022-04-27T15:29:30+5:30

ह्युंदाईने पुढील सहा वर्षांत भारतात सहा ईलेक्ट्रीक कार लाँच करण्याचा प्लॅन आखला आहे.

Hyundai IONIQ 5 in India: Hyundai's electric car will come soon in India; two Engines, all four wheels drive | Hyundai IONIQ 5 in India: ह्युंदाईची इलेक्ट्रीक कार येतेय; नवीन पर्याय, चारही चाकांना ताकद मिळणार

Hyundai IONIQ 5 in India: ह्युंदाईची इलेक्ट्रीक कार येतेय; नवीन पर्याय, चारही चाकांना ताकद मिळणार

Next

ह्युंदाईने भारतात इलेक्ट्रीक कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कियादेखील यंदा ईव्ही कार लाँच करणार आहे. दुसऱ्या सहामाहीमध्ये ह्युंदाई भारतात ऑल ईलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. तत्पूर्वी ह्युंदाईने आपल्या या कारवरून पडदा हटविला आहे. 

ह्युंदाईने पुढील सहा वर्षांत भारतात सहा ईलेक्ट्रीक कार लाँच करण्याचा प्लॅन आखला आहे. ह्युंदाईने Ioniq 5 कार दाखविली. Ioniq 5 ने 2022 चा वर्ल्ड कार ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला आहे. त्यानंतर कंपनीने 2022 मध्ये ही कार भारतात आणण्याचा विचार सुरु केला आहे. Ioniq 5 ही ह्युंदाईच्या स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मला  E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) म्हणतात.

Ioniq 5 मध्ये खास बाब म्हणजे, याचे डिझाईन ८० च्या दशकावरून प्रेरित आहे. परदेशात Hyundai Ioniq 5 चे दोन पावरट्रेन देण्यात आले आहेत. पहिली सिंगल मोटर लेआऊट आहे, जे  169hp आणि 350Nm चा टॉर्क उत्पन्न करते. या इंजिनमुळे मागच्या चाकांना ताकद मिळते. तर दुसऱ्या पर्यायात दोन मोटर देण्यात आल्या आहेत. त्यात ऑल व्हील ड्राईव्ह लेआऊट मिळतो. यामध्ये 325hp ताकद आणि 605Nm टॉर्क मिळतो. 

या कारमध्ये 800V बॅटरी तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यामध्ये अल्ट्रा रॅपिड चार्जिंगची यंत्रणा देण्यात आली आहे. 220kW DC चार्जरचा वापर करून बॅटरी केवळ १८ मिनिटांत १० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते. 

Web Title: Hyundai IONIQ 5 in India: Hyundai's electric car will come soon in India; two Engines, all four wheels drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.