ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 20:46 IST2025-09-17T20:45:55+5:302025-09-17T20:46:58+5:30
यामुळे ग्राहकांना जबदस्त फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय बाजारात, ही कार टाटा पंच, रेनॉल्ट किगर आणि निसान मॅग्नाइट सारख्या मॉडेल्सची स्पर्धक आहे...

ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
ह्युंदाईच्या एंट्री-लेव्हल एक्सटर एसयूव्हीला अद्यापही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये क्रेटा आणि व्हेन्यू नंतर, ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. जर आपण सप्टेंबर महिन्यात ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर लक्षणीय सूट मिळू शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, सध्या कंपनी या कारवर ₹५०,००० ची सूट देत आहे. याशिवाय, २२ सप्टेंबरपासून, हिच्यावर टॅक्सच्या ₹८६,१५६ रुपयांचीही बचत होईल.
यामुळे ग्राहकांना जबदस्त फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय बाजारात, ही कार टाटा पंच, रेनॉल्ट किगर आणि निसान मॅग्नाइट सारख्या मॉडेल्सची स्पर्धक आहे. हिच्या पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज १९ किमी/लीटर, तर सीएनजी व्हेरियंटचे मायलेज २७.१ किमी/किलो एवढे आहे.
एक्सटरची सध्याची एक्स-शोरूम किंमत साधारणपणे ₹५९९,९०० एवढी आहे. २२ सप्टेंबरपासून, तिची नवी किंमत साधारणपणे ₹५६८,०३३ असेल. अर्थात किमान ₹३१,८६७ आणि टॉप मॉडेलवर कमाल ₹८६,१५६ ची बचत होईल. Xter वरील डिस्काउंटसंदर्भात बोलायचे झाल्यास, EX पेट्रोल व्हेरिएंटवर ₹५,०००, EX CNG व्हेरिएंटवर ₹२५,०००, CNG S Smart आणि SX Smart व्हेरिएंटवर ₹४५,०००, इतर CNG व्हेरिएंटवर ₹५०,०००, MT पेट्रोल व्हेरिएंटवर (S Smart/SX Smart आणि इतर) ₹४५,००० आणि AMT पेट्रोल व्हेरिएंटवर (सर्व) ₹५०,००० पर्यंतच्या डिस्काउंटचा समावेश आहे.
Hyundai Xter EX व्हेरिएंटची वैशिष्ट्ये -
या व्हेरिएंटमध्ये १.२-लिटर पेट्रोल MT इंजिन असेल. हिच्या फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास. हिच्या मध्ये, सहा एअरबॅग्ज, EBD सह ABS, सेंट्रल लॉकिंग, कीलेस एंट्री, सर्व सीट्ससाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, LED टेल लॅम्प, बॉडी-कलर्ड बंपर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ४.२-इंच MID सह, मल्टीपल रीजनल UI भाषा, फ्रंट पॉवर विंडो, अॅडजस्टेबल रिअर हेडरेस्ट, मॅन्युअल एसी, ड्रायव्हर सीट हाइट एडजेस्टमेंट, रियर पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (केवळ EX (O)), हिल स्टार्ट असिस्ट (केवळ EX (O)) आणि व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (केवळ EX (O)), याशिवाय इतरही अनेक फीचर्सचा समावेश आहे.