Hyundai च्या 'या' कारवर मिळतेय 30,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 02:00 PM2023-07-14T14:00:47+5:302023-07-14T14:01:18+5:30

जाणून घेऊया काय आहे, या कारची खासियत?

hyundai discount offer july 2023 grand i10 nios upto rs 38000 off | Hyundai च्या 'या' कारवर मिळतेय 30,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट!

Hyundai च्या 'या' कारवर मिळतेय 30,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट!

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या तुम्ही ह्युंदाईची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीच्या एका कारवर मोठी सवलत मिळत आहे. दरम्यान, ह्युंदाई ग्रँड i10 Nios खरेदी करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. कारण कंपनी जुलै महिन्यात या कारवर जवळपास 38,000 रुपयांपर्यंत मोठी सूट देत आहे. 

लोकप्रिय हॅचबॅक या वर्षाच्या सुरुवातीला फेसलिफ्ट करण्यात आली होती आणि ही कार एकमेव इंजिन ऑप्शनसह 83hp, 1.2-लिटर, पेट्रोल इंजिन, 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी गिअरबॉक्ससोबत मिळत आहे. जाणून घेऊया काय आहे, या कारची खासियत?

डिस्काउंट ऑफर
जर तुम्ही जुलैच्या अखेरीस Grand i10 Nios खरेदी केल्यास तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Grand i10 Nios ची सुरुवातीची किंमत 5.73 लाख ते 8.51 लाख रुपये आहे. विशेष बाब म्हणजे Grand i10 Nios सीएनजी व्हेरिएंटसह देखील उपलब्ध आहे.

फीचर्स
कारच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, Sportz एक्झिक्युटिव्ह ट्रिममध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळत नाही. त्याऐवजी, मॅग्ना ट्रिम प्रमाणे या व्हर्जनमध्ये मॅन्युअल एसी देण्यात आला आहे. Sportz एक्झिक्युटिव्ह ट्रिमला मॅग्ना आणि Sportz व्हेरिएंटदरम्यान ठेवली आहे. Sportz आणि Sportz एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंटमधील किंमतीतील फरक 3,500 रुपयांचा आहे.

इंजिन 
फेब्रुवारीमध्ये कंपनीने भारतात आपले Grand i10 Nios मॉडेल लाँच केले होते. Hyundai i10 NIOS सध्याच्या मॉडेल किंवा भारतात विकल्या गेलेल्या मॉडेलच्या तुलनेत किरकोळ अपडेट्ससह येते. N-लाइन व्हर्जनमध्ये आलेली ही Hyundai कार, N Performance Division द्वारे प्रेरित डिझाइनसह येते. Grand i10 NIOS मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 82 Bhp आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन एकतर 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT सह जोडलेले आहे.

Web Title: hyundai discount offer july 2023 grand i10 nios upto rs 38000 off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.