Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:15 IST2025-11-17T18:14:29+5:302025-11-17T18:15:14+5:30
...यामुळे, आपण पुढीलवर्षात या सेगमेंटमध्ये कार खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे.

Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये गेल्या काही वर्षांत ह्युंदाई क्रेटाचा जबरदस्त दबदबा आहे. मात्र आता याच सेगमेंटमध्ये दोन नव्या एसयूव्ही लवकरच बाजारात येत आहेत. ज्या क्रेटाला थेट टक्कर देऊ शकतील. रेनॉ आणि निसान पुढील वर्षात त्यांच्या नव्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे, आपण पुढीलवर्षात या सेगमेंटमध्ये कार खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे.
रेनॉची नवीन डस्टर 26 जानेवारी 2026 रोजी भारतीय बाजारात येणार आहे. मस्क्युलर बॉडी, बॉक्सी डिझाइन आणि दमदार रोड-प्रेझेन्समुळे ही एसयूव्ही ग्राहकांना आकर्षित करू शकते. या कारला रेक्टॅंग्युलर हेडलाइट्स दिले जातील, यात Y-शेपच्या DRLs असतील. उंच बोनट, मजबूत रूफ रेल्स आणि मोठे व्हील आर्चेस यामुळे तिला रग्ड आणि एसयूव्ही सारखा लूक मिळतो. हिची लांबी सुमारे 4,345 मिमी असेल.
इंटीरिअर आणि फीचर्स असे -
नव्या Duster चे केबिनही आधीच्या तुलनेत अधिक मॉडर्न दिसेल. 7-इंचांचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1-इंचांचे टचस्क्रीन ज्यात वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto चा सपोर्ट असेल. तसेच या कारमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक यांसारखे फीचर्स अपेक्षित आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये ADAS मिळू शकते. सुरुवातीला 1.0-लिटर आणि 1.3-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, तर 1.8-लिटर हायब्रिड इंजिन 2027 च्या सुरुवातीला उपलब्ध होऊ शकते.
निसानची नवी टेकटन एसयूव्ही जून 2026 च्या आसपास भारतीय बाजारात येईल. कारण रेनॉ आणि निसान एकाच प्लॅटफॉर्मवर काम करतात. यामुळे टेकटनचे इंजिन आणि मेकॅनिकल घटक डस्टरसारखेच असण्याची शक्यता आहे. परंतु डिझाइन पूर्णपणे वेगळे असेल. कनेक्टेड डीआरएल्स आणि टेल लाइट्समुळे तिला मॉडर्न लुक मिळेल. ही एसयूव्ही आतून डस्टर प्रमाणेच असण्याची शक्यता आहे. मात्र, फीचर्स आणि फिनिशिंगमुळे टीकटन काहीशी महाग असण्याची शक्यता आहे.