यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:10 IST2025-07-27T16:04:05+5:302025-07-27T16:10:02+5:30

तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर एक मोठी संधी आहे.

Hyundai Cars There won't be a better opportunity than this; Hyundai is offering a discount of Rs 1 lakh on its cars | यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Hyundai  Cars: तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर एक मोठी संधी चालून आली आहे. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Hyundai ने जुलै महिन्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. Hyundai त्यांच्या तीन कार्सवर ८० हजार रुपयांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट देत आहे. हा डिस्काउंट Hyundai Tucson, Hyundai Venue आणि Hyundai Grand i10 Nios वर मिळतोय. 

तुम्ही नवीन कारच्या शोधात असाल, तर तुम्ही या कार खरेदी करुन मोठी बचत करू शकता. पण, तुम्हाला घाई करावी लागेल, कारण ही ऑफर फक्त जुलै २०२५ च्या अखेरीपर्यंत वैध आहे. म्हणजेच, तुमच्याकडे तीन दिवस शिल्लक आहेत, लवकरच कारची बुकिंग करुन डिस्काउंटचा लाभ मिळवू शकता. डिस्काउंटची रक्कम शहर आणि डीलरशिपनुसार कमी अधिक असू शकते. त्यामुळे जवळच्या डीलरशिपला भेट देऊन तेथील किंमत तपासून घ्या. 

कोणत्या कारवर किती डिस्काउंट?
जुलै महिन्यात Hyundai Tucson च्या डिझेल व्हेरिएंटवर १ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. यासोबतच, तुम्हाला कंपनीच्या दुसऱ्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या व्हेरिएंट SUV Hyundai Venue वर ८५ हजार रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय, Hyundai Venue N-Line वर ८५ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तर, Hyundai Grand i10 Nios च्या CNG व्हेरिएंटवरही ८५,००० रुपयांची सूट मिळत आहे. या डिस्काउंटमध्ये रोख आणि एक्सचेंज बोनस सामील आहे.

Hyundai Tucson चे फिचर्स
या कारच्या केबिनमध्ये तुम्हाला मोठी 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यासोबतच, त्यात मोठा ड्रायव्हर डिस्प्ले आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान यासारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, त्यात पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, फ्रंट सीटसाठी हीटिंग आणि वेंटिलेशन आहे. यामध्ये, तुम्हाला वायरलेस फोन चार्जिंग सारखी स्मार्ट वैशिष्ट्ये देखील मिळतात. Hyundai Tucson ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹२९.२७ लाख पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंट सुमारे ₹३६.०४ लाख पर्यंत जातो.

Web Title: Hyundai Cars There won't be a better opportunity than this; Hyundai is offering a discount of Rs 1 lakh on its cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.