जबरदस्त लूक आणि फीचर्ससह लाँच झाली Hyundai Aura Facelift, पाहा किंमत आणि खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 05:30 PM2023-01-23T17:30:46+5:302023-01-23T17:31:54+5:30

Hyundai Motors ने भारतीय बाजारात नवीन ऑरा फेसलिफ्ट लाँच केली आहे.

Hyundai Aura Facelift Launched with Stunning Looks and Features Check Price and Exclusive Features | जबरदस्त लूक आणि फीचर्ससह लाँच झाली Hyundai Aura Facelift, पाहा किंमत आणि खास फीचर्स

जबरदस्त लूक आणि फीचर्ससह लाँच झाली Hyundai Aura Facelift, पाहा किंमत आणि खास फीचर्स

googlenewsNext

2023 Hyundai Aura Facelift Launch Price Features : Hyundai Motors ने भारतीय बाजारात नवीन ऑरा फेसलिफ्ट लाँच केली आहे. याची किंमत 6.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू आहे. 4 एअरबॅग्ज (स्टँडर्ड) आणि 6 एअरबॅग्ज (ऑप्शनल) यांसह 30 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज असलेली ही सेडान कार 6 मोनोटोन कलर ऑप्शनसह येते. नवीन Aura साठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला फर्स्ट-इन-सेगमेंट वायरलेस चार्जिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, TICE-C USB फास्ट चार्जरने सुसज्ज असलेल्या 2023 ह्युंदाई ऑरा फेसलिफ्टबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत.

काय आहेत फीचर्स?
नवीन ऑरा फेसलिफ्टमध्ये 1.2L Kappa पेट्रोल इंजिन 5-स्पीड MT/AMT पर्यायासह देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 rpm वर 83 PS पॉवर आणि 113.8 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. कारचे 1.2 लिटर बाय फ्युअल (पेट्रोल+सीएनजी) इंजिन 5 स्पीड एमटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हे 6000 आरपीएमवर 69 पीएस पॉवर आणि 4000 आरपीएमवर 95.2 न्यूटन मीटर पिकअप टॉर्क जनरेट करते. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3.5-इंचाचा मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, फूटवेल लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, 8-इंच स्क्रीन, स्टीयरिंग व्हील माउंटेड कंट्रोल्स आणि क्रूझ कंट्रोल तसेच पुश स्टार्ट/स्टॉप बटण देण्यात आलेय.


किती आहे किंमत?
New Hyundai Aura E 1.2 Petrol MT- 6,29,600 रुपये

New Hyundai Aura S 1.2 Petrol MT- 7,15,000 रुपये

New Hyundai Aura SX 1.2 Petrol MT- 7,92,400 रुपये

New Hyundai Aura SX (O) 1.2 Petrol MT- 8,57,900 रुपये

New Hyundai Aura SX+ 1.2 Petrol AMT- 8,72,600 रुपये

New Hyundai Aura S 1.2 Petrol+CNG MT- 8,10,000 रुपये

New Hyundai Aura SX 1.2 Petrol+CNG MT- 8,87,400 रुपये

या सर्व किंमती एक्स शोरुम आहेत.

Web Title: Hyundai Aura Facelift Launched with Stunning Looks and Features Check Price and Exclusive Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.